समूहाची माहिती किंवा कृती कार्यक्रम

समूहाची स्थापना *सामजिक माध्यमातून होणारा दुष्प्रचार थांबवण्यासाठी व समाजात वेगवेगळ्या पातळीवर काम  करणाऱ्या लोकांना व तरुणांना जोडण्यासाठी झाली.*

दि22फेब्रुवारी2015 रोजी गांधीभवन कोथरूड येथे पहिले ,24 जानेवारी 2016 रोजी रांजणगाव जवळील कृषी पर्यटन केंद्र येथे दुसरे तर वाई येथील विश्वकोष संस्थेत तिसरे स्नेहसंमेलन पूर्ण झाले.

समाजप्रबोधन सोबतच विधायक कार्य हे समूहाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

सध्याच्या सामजिक प्रश्नावर उत्तरे मिळावीत या उद्देशाने 2016 पासून दर महिन्यात एक अशी ‘चांगले विचार युवा व्याख्यानमाला’ समूहातर्फे आयोजित केली जाते.

आत्तापर्यंत पुण्यात 8 व्याख्याने आणि औरंगाबाद मध्ये 1 अशी 9 व्याख्याने झाली आहेत ती खालीलप्रमाणे

1-गांधी आंबेडकर समज गैरसमज आणि विचार समन्वय-रमेश ओझा

2-पर्यावरण आणि बदलती जीवनशैली -प्रा उदयन गायकवाड, प्रमुख उपस्थिती- स्मिताजी सोनेजी,गुजरात, कुलकर्णी पुणे

3-पर्यावरण,  पाणी- पी बी शितोळे , डॉ एम एच देसरडा

4-शिक्षणाचे बाजारीकरण-प्रा मिलिंद वाघ आणि डॉ राम ताकवले

5-आरोग्य क्षेत्रातील गैरव्यवहार-डॉ अरुण गद्रे

6-महात्मा गांधी समज गैरसमज-तुषार गांधी, संजय आवटे, विवेक सावंत

7-ऐसी जीवनाची कळा-कलिंदीताई सरवटे, ब्राम्हविद्या आश्रम , वर्धा

8-गांधीविचार आजच्या संदर्भात-डॉ विश्वंभर चौधरी

9-गांधीजींची आठवण आज का- ज्ञानप्रकाश मोदानी, प्रा.जयदेव डोळे

*समूहाचे विधायक कार्यक्रम*

*Mission Education*

1-School kit donation
आंनद शाळा,(बेघर कामगारांच्या मुलांची शाळा)फैजपूर,जळगाव येथे स्कूल किट वाटप
2-निवारा आश्रम, जामखेड येथे स्कूल बॅग वाटप
3-blanket donation drive in pune
4-usmanbad , suicide farmer survey
5.-yerwada jail programm for prisoners
6-book launch of one member

7-participation in TV shows and various other social platforms for spreading rational & gandhian thoughts

Other activities

एक दिवस अन्नदात्यासाठी या मोहिमेची सामजिक माध्यमाद्वारे मोहीम ज्यात 82 सदस्यांनी शेतकरी आत्महत्येला सहवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवस उपवास ठेवला

समूहात काय होते

1) या ग्रुपमध्ये सैध्दांतिक पातळीवर काम करणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे असे दोन गट आहेत ज्यामुळे कृतीशील कार्यक्रम करायला दिशा मिळते.

2) शाळा-महाविद्यालयांमधून प्रबोधनात्मक कार्यक्रम सोबतच दर महिन्याला एक व्याख्यानमाला

3) परिसरातील लोकांमध्ये वैचारिक बदल घडवून आणण्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी त्यावर समूहात आपापसात चर्चा घडवून आणली जाते. सामाजिक काम करण्यासाठी आपल्या परीसरातूनच सुरुवात करतात

4) कृती कार्यक्रमासाठी प्रत्येकाने आपल्या आवाडीच्या कामापासून सुरुवात करणे काम करतांना योग्य-अयोग्याचा विचार केला जातो.

5) तात्कालिक संघर्षाच्या मुद्यावर प्रतिक्रिया देत संघर्ष करणे आणि इतरवेळी रचनात्मक पद्धतीने नाविन्यपूर्ण काम करणे यावर भर .म्हणजेच एकाचवेळी संघर्षात्मक काम आणि रचनात्मक काम यांची सांगड घालण्याचा प्रयत्न

6) लोकशाहीच्या रक्षणासाठी भारतीय संविधानाचे महत्व लोकांना पटवून देणे. संविधानातील कलमांच्यानुसार जर लोक वागू लागले तर अनेक प्रश्न सुटायला मदत होईल. तसेच मानवतावादी दृष्टीकोन निर्माण व्हायलाही मदत होईल.

7) आपली शिक्षण पद्धती linear thinking म्हणजे एका प्रश्नाला एकच उत्तर या विचारावर आधारलेली आहे. त्यात बदल व्हायला हवा.कारण समाजात एका प्रश्नाला अनेक कंगोरे असू शकतात. तेव्हा त्या प्रश्नांचा अनेकांगानी विचार करता यायला हवा. अशाप्रकारे लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न. ग्रुपच्या सदस्यांसाठी हे एक मोठे आव्हान आहे.

8) समाजात राहूनच समाजसुधारणा कराव्या लागतात. व्यवस्था समजून घ्यायची असेल किंवा बदलायची असेल तर तिचा भाग होऊनच आपल्याला सहभागी व्हावे लागेल. तेव्हा ग्रुपच्या सदस्याने लोकांशी बोलतांना आपल्या विचारांचा दबाव आणून मी म्हणतो तेच खरे असा आडमुठेपणा करू नये. नाहीतर लोक आपले कान बंद करतात, आणि आपल्याला काम करणे कठीण जाते. त्यातून मग निराशा पदरी येऊ शकते. So we have to be in the system to change the system.हे तत्व पाळणे

9) सामाजात काम करतांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न यांची ग्रुपमध्ये चर्चा होते ज्यामुळे त्यांची सोडवणूक करण्यास मदत होते.तसेच इतर सदस्यांनाही कामाचे स्वरूप आणि आवाका कळतो आणि कोणत्या स्वरूपाची मदत करावी तेही कळते.

10) राजकारण समाजकारणातून वेगळे काढणे कठीण असले तरी प्रत्येक सदस्याने आपल्या मर्यादा ओळखून काम करतो.त्याप्रमाणे आपल्या कामाची चौकट आखून घेतलेली आहे. राजकारण्यांशी योग्य अंतरावरचे संबंध ठेवूनही त्यांच्याकडून काही सुधारणा शासकीय पातळीवरून करून घेता येतात, आणि स्थानिक पातळीवरचे प्रश्न सुटावयास त्यांची मदत होऊ शकते. अशाप्रकारचे कौशल्य आपल्या ग्रुपच्या सदस्यांने अंगी बाणवन्यासाठी नेहमीच प्रयत्न असतो.

11) जागतिकीकरणाचे परिणाम सामान्य माणसाला दिसत असतात. ह्या आधुनिक प्रवाहात समान्यांचा स्तर व सहभाग वैचारिक आणि आर्थीकदृष्ट्या कसा उन्नत करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत सकारात्मक बदल होण्यास मदत होईल.

12) गाव पातळीवर काम करणाऱ्या सदस्यांना इतर सदस्य मदत करतात. कोणत्या प्रकारच्या कामाची मदत लागेल ते त्यांनी सांगावे, म्हणजे त्यांच्या कामाला इतर सदस्यांना हातभार लावता येईल. त्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या सदस्यांचा जण्यायेणे,राहणे व जेवणाचा खर्च गावपातळीवर काम करणाऱ्या सदस्याने करावा.

13) कुप्रथा, अंधश्रद्धा, चुकीच्या चालीरीती, कर्मकांड आणि भ्ष्टाचारी व्यवस्था बदलण्यासाठी पर्यायी व्यवस्था द्यावी लागेल. कारण सामान्य माणूस पोकळीत राहू शकत नाही.तसेच तो ताबडतोबीने विवेकवादीही होऊ शकत नाही. म्हणून समाजाला नवीन सण-उत्सव द्यावे लागतील, पण त्यांचेही कर्मकांडात रूपांतर होणार नाही याचे भान ठेवावे लागेल. त्यावर मंथन समूहात होते

14) 21व्या शतकात महात्मा गांधींचा “खेड्याकडे चला” हा विचार नवीन पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायला हवा. त्यासाठी “सिलेज” (city in village = cilage) ही संकल्पना राबवावी लागेल. सध्याच्या संगणक युगामुळे हे शक्य आहे. असे झाले तर खेड्यातच शहर निर्माण होईल, आणि शेतकऱ्याच्या स्थलांतरणाचा प्रश्नही सुटू शकेल.

15) सामाजिक कार्यात,चळवळींमध्ये किंवा समाजसुधारणेत आपले जीवन समर्पित केलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याला एकटे पडु न देणे त्यांचा आत्मविश्वास वाढवणे

16)फेसबुक ,Whatsapp वर पसरणार्या खोट्या, सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणार्या ईतिहास आणि वर्तमानातील घटनांची मोडतोड करणार्या अफवा व भडक साहित्याविरुध्द कार्य करणे

17)

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपला ग्रुप हा प्रत्यक्षात काम करणाऱ्या कृतीशील कार्यकर्ते आणि चळवळी यांच्यासाठी एक मदत गट म्हणून तयार होऊ शकतो. व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर आपण एकमेकांना मदत करू शकतो.

समूहाचा साम टीव्ही वरील सहभाग असणाऱ्या कार्यक्रमाची लिंक-

भाग १ – https://www.youtube.com/watch?v=1iLcWSNcedg

भाग २-  https://www.youtube.com/watch?v=_Iq_7La6Apo

Whatsapp समूहासाठी खालील सदस्यांना वैयक्तिक संपर्क करावा

प्रल्हाद मिस्त्री-9420914987

गणेश चोंधे-9763715001

नचिकेत कोलापकर-9420690939

बाहुबली गट-8275450549

संकेत मुनोत -8087446346

Knowing Gandhism Global Friends

Leave a Reply