अरुण साधू यांचे तरुणांना आवाहन आणि महात्मा गांधी बद्दल चे विचार

देश बदलण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. ही ताकद त्यांनी रचनात्मक कार्यासाठी वापरली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरुण साधू यांनी केले..
श्री. साधू म्हणाले की, महात्मा गांधींच्या तत्त्वांचा विचार आज जगभर होत आहे. जगभरातील विचारवंत बुद्ध, खिस्त आणि गांधी अशी परंपरा सांगताना दिसतात. गांधींचा विचार नीतिमत्ता आणि चारित्र्य घडविण्याचा विचार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जसजसा विकास होत आहे. त्याचबरोबर गांधी विचारांनादेखील महत्त्व प्राप्त होत आहे. गांधींचा विचार हा मानवी जीवन उत्तम करणारा विचार आहे. जगभरातील महत्त्वाचे नेते ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, नेल्सन मंडेला अशा अनेकांचे गांधी प्रेरणास्थान आहे.
उद्याच्या भावी शिक्षकांना उद्देशून प्रा. साधू म्हणाले की, गांधी विचारांचा अमूल्य ठेवा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना द्या. त्यामुळे येणारी पिढी सुजाण व सकारात्मक विचारांची बनेल.

जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत जे. ई. एस. महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्र आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या गांधी विचार प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन श्री. साधू यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते

अरूण साधू (जन्म : १७ जून १९४१ मृत्यू : २५ सप्टेंबर २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते..

Reference- लोकसत्ता, मराठवाडा वृत्तान्त जालना, २८ जानेवारी

Link- http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=132436:2011-01-28-18-14-01&Itemid=1

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply