बाष्कळ पांडित्याला बापूंचा जबाब

गांधीजी सिद्धांताचा निवाडा त्याच्या व्यवहारातील परिणामावरुन करीत असत. एका गृहस्थाला मुलाखतीसाठी दहा मिनिटांचा वेल देण्यात आला होता. तो बापूजींच्या मौनाचा दिवस होता. त्या गृहस्थाने सात मिनिटे आपला प्रश्न प्रभावीपणे मांडून शेवटी बापूंच्या सल्ल्याची अपेक्षा केली. बापूंनी पाटीवर लिहिले, ” आपण प्रश्नावर दीर्घकाल बोललात, त्यावरुन असे दिसते की तुम्हाला प्रश्न कललेला नाही.” तो गृहस्थ स्तब्ध झाला. बापूंनी पुन्हा लिहिले, ” काम करणारा थेट व्यावहारीक प्रश्नाबद्दल बोलतो” तो गृहस्थ सौम्यपणे म्हणाला, “बापूजी, मला अडचणी आहेत” बापूंनी उत्तरात लिहिले, ” जा आणि काम कर, कामच तुझे प्रश्न सोडवेल”. (An atheist with Gandhi, by Gora, या पुस्तकाच्या विजय तांबे यांनी केलेल्या अनुवादातून) म्हाता-याला शब्दजालात अडकवणे शक्य नव्हते, आचार हीच कुठल्याही सिद्धांताची सिद्धता असे ते मानत असल्याने बाष्कल पांडित्याचा त्यांच्यापुढे निभाव लागत नसे! म्हणूनच ते एवढे काम करु शकले!

Leave a Reply