भगतसिंह फाशी आणि गांधीजींचे प्रयत्न

म.गांधीजी भगतसिंह यांची फाशी रोखु शकत होते.??

एखाद्या विषया बद्दल आपले मत व्यक्त करत असताना त्या विषया बद्दलचे आपण वाचन, चिंतन,मनन,व अभ्यास पूर्वक सखोल अध्ययन केले पाहिजे.आपले मत तर्कसंगत असले पाहिजे.आजच्या तरुण पिढीतील काही तरुण ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवतात. म.गांधीजी भगतसिंह यांची फाशी रोखु शकत होते..?त्यांनी प्रयत्न केले नाहीत..? ही गोष्ट फार चुकीची आहे.लोक असे म्हणत असताना एक गोष्ट विसरून जातात त्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो. म.गांधीजींच्या म्हणन्या नुसार जर सर्व काही घडत असत तर स्वातंत्र्यासाठी चळवळ,आणि क्रांतिकारकांना आपल्या प्राणांचे बलिदान द्याव लागल नसत.
अर्जुनसिंह(आजोबा)किशनसिंह(वडिल) अजितसिंह (काका)स्वर्णसिंह(काका) स्वातंत्र्याचे बीज जरी घरात रुजलेले असले तरी,भगतसिंह यांनी स्वातंत्रलढ्याची पहिली सुरूवात ही १९२० म.गांधीच्या असहकार आंदोलनातून केली.वडिलांच्या परवानगीने ९वीतील शाळा सोडून आंदोलनाला सर्वस्वी वाहून घेतले.
३० ऑक्टोबर १९२८ लाहोर रेल्वे स्टेशनवर सायमन कमिशनला विरोध करण्यासाठी लोक जमले होते.निदर्शन अहिंसेच्या मार्गाने चालू होते.पोलिसांनी लोकांना निर्दयपणे मारहाण करावयास सुरूवात केली.स्कॉट,सौंडर्स या अधिकाऱ्यांनी लाला लजपतराय यांच्या छातीवर, डोक्यावर काठीचे वार करून त्यांना जखमी केले.या अमानवीय निर्घृण हल्यानंतर लजपतराय आजारी पडले आणि १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. भगवतीचरण व्होरा यांच्या पत्नी क्रांतिकारक दुर्गादेवी या क्रांतिकारकांच्या बैठकीत क्रांतिकारकांना म्हणाल्या तुम्ही हातात बांगड्या भरल्यात काय,आपण लालाजींच्या हत्येचा सूड उगविण्यासाठी स्कॉटचा वध केला पाहिजे आणि आपण ही कृती करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
१७ डिसेंबर १९२८ ला भगतसिंह आणि राजगुरू यांनी या अधिकाऱ्याला गोळ्या घालून मारले. मारला गेलेला स्कॉट नसून सौंडर्स होता पण हा ही त्या अमानविय लाठीमारात सहभागी होता.सौंडर्स वधा बद्दल क्रांतिकारकांचे मत लालाजींसारख्या आदरणीय नेत्याची हत्या करून इंग्रजांनी भारताच्या तरुणांना आणि त्यांच्या पुरुषार्थास आव्हान दिले होते.जगाने हे लक्षात घ्यावे की आम्ही भारतीय जिवंत आहोत आणि देशाचा सन्मान राखण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे बलिदान करावयास तयार आहोत.मनुष्यांचे रक्त सांडल्याबद्दल आम्हास खेद आहे पण अत्यंत क्रूरपणे दडपशाही करणाऱ्या संस्थेचा हा माणूस प्रतिनिधि होता.कधी कधी हिंसा अपरिहार्य ठरते.आम्ही या गोष्टी समाजात आमूलाग्र क्रांती घडवून आणण्यासाठी करीत आहोत.या क्रांतीमुळे माणसाने माणसाचे केलेले शोषण बंद होईल.
क्रांतिचा अर्थ भगतसिंह त्यांच्या जागी काय होता आदि हे लक्षात घ्यायला हवे.

क्रांति… प्रगतीसाठी परिवर्तनाची इच्छा आणि आकांक्षा!मनुष्य जातीचा आत्मा क्रांतिच्या या भावनेने सतत ओतप्रोत भरलेला असायला पाहिजे.
क्रांति म्हणजे केवळ एखादा उठाव किंवा रक्तरंजित लढा नव्हे.अस्तित्वात असलेली परिस्थिती संपूर्ण नष्ट करून त्या जागी नव्या आणि जास्त सुयोग्य पायावर आधारित अशा समाजाचा पध्दशीर आखलेला कार्यक्रम.
“बहिऱ्यांनो आता जागे व्हा.. बहिऱ्यांना ऐकू जाण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज असते”. मार्च १९२९ केंद्रिय कायदेमंडळात बॉम्बफेकण्याचा क्रांतिकारकांचा निर्णय, कोणालाही इजा होणार नाही याची दक्षता घेतली जाणार होती.बॉम्ब फेक केल्यावर पळून न जाता धैर्याने तेथेच उभे रहावे आणि अटक करवून घ्यावी.अटकेनंतर त्यांच्यावर खटला भरला जाईल.आणि हीच खरी संधि साधुन त्यांच्यावरील खटल्यांत जी भाषणे होतील त्या भाषणांतून आपले विचार जन सामान्या प्रयन्त मांडता येतील.त्यामुळे लोकांत मोठ्या प्रमाणात जागृती होईल.त्यांच्या स्वातंत्र्याबद्दलच्या आकांक्षा जास्त तीव्र होतील.हे काम करण्यासाठी भगतसिंह यांनी आपले नाव पुढे केले.
पण चंद्रशेखर आझाद यांना ते मान्य नव्हते,कारण त्यांना असे वाटत होते जर का एकदा ते अटक झाले तर सौंडर्स वधाचा खटला भरला जाईल.सरकार तर कोणत्याना कोणत्या कारणाने त्यांना अडकवण्याच्या नादात होते.कदाचित यात त्यांना फाशीची शिक्षा झाली असती.भगतसिंह यांनी आझादांची खूप समजूत काढली.या ध्येयासाठी व उद्दिष्टासाठी आम्हाला जी शिक्षा दिली जाईल,त्यामुळे होणाऱ्या सर्व हालांचे आम्ही स्वागत करू.आम्ही आमचे तारुण्य जाळण्यासाठी आणले आहे.कारण अशा भव्य ध्येया पुढे कोणताही त्याग लहानच ठरेल

बॉम्ब का टाकला हे प्रभावी मांडणे गरजेचे आहे.

इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान,विषयांची अवांतर माहिती त्यांच्या जवळ होती.अशा वेळी आपण या कामात पुढे असणे त्यांना रास्त वाटत होते. आपल्या अशा बलिदाना पासून युवक प्रेरणा घेतील याची पुर्ण खात्री त्यांना होती.
८ एप्रिल १९२९ रोजी केंद्रीय कायदे मंडळात बॉम्ब फेकला गेला.भगतसिंह व बटुकेश्र्वर दत्त यांनी स्वताला अटक करून घेतले. कारागृहात चांगल्या सुविधांसाठी त्यांनी उपोषण केले. सत्याग्रह या प्रभावी अस्त्राचा वापर त्यांनी वेळोवेळी केल्याचे आपल्याला दिसून येते.या मध्ये त्यांचे सहकारी मित्र यतींद्रनाथ दास यांचा मृत्यु झाला. सरकारला दाखऊन द्यायच होत की स्वातंत्र्याच्या या संघर्षात तुम्ही निकराची टक्कर देऊ शकता.
७ ऑक्टोबर १९३० भगतसिंह, राजगुरू,व सुखदेव यांना देहांत शासनाची शिक्षा देण्यात आली.भगतसिंह च्या वडिलांनी भगतसिंह व त्यांच्या साथीदारांची फाशी रद्द व्हावी म्हणून ब्रिटिश गव्हर्नरकडे प्रार्थना पत्र पाठवले.यामुळे भगतसिंह कासावीस झाले. या विनंती पत्रामुळे वाईट वाटून त्यांनी वर्तमान पत्रातून जाहीर पत्र वडिलांना लिहले.त्यात म्हटले होते की,”पिताजी मै बहुत चिन्ता अनुभव कर रहा हूँ मुझे डर है कि आप पर दोष लगाते हुए,या उससे भी अधिक आपके इस कार्य की निन्दा करते हुए में कही सभ्यता की सीमा को लांघना जाऊ और मेरे शब्द अधिक कठोर न बन जाए. में जानता हूँ कि आपने सारा जीवन भारत के स्वतंत्रता के लिए न्योच्छावर किया है,परंतु इस महत्व पुर्ण घडी में आपने ऐसी दुर्बलता क्यों दिखाई? में यह बात समझ नही पाया.
कैदेत असताना बटुकेश्वर दत्तला लिहले पत्र. या कोठडीमध्ये माझ्या खेरीज फाशीची प्रतिक्षा करणारे खुप गुन्हेगार आहेत ते लोक अशी प्रार्थना करीत आहेत,की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी परंतु त्यांच्यातून मीच एक मात्र असा माणूस आहे की त्या दिवसाची मोठ्या उत्सुकुतेने वाट पाहत आहे.आपल्या आदर्शा साठी फाशी वर लटकण्याचे भाग्य मला मिळेल. फाशीच्या तखतावर मी आनंदाने चढेन आणि क्रांतिकारक आपल्या आदर्शा साठी किती शौर्याने बलिदान देऊ शकतात.हे जगाला दाखवून देईन .
जयदेव कपूरनी (सहकारी मित्र) भगतसिंगांना विचारले सरदार तुम्ही मृत्यू कडे जात आहात, मला विचारावंसं वाटतं , तुम्हाला या बद्दल वाईट तर वाटत नाही..? “इतक्या छोट्या आयुष्याची या पेक्षा जास्त किंमत काय होऊ शकते”.
या क्रांतिकारकांचे कायदेशीर सल्लागार श्री. प्राणनाथ मेहता तिघांनकडे मागणी करतात की सरकार कडे दयेचा अर्ज द्यावा.भगतसिंह त्यावेळी त्यांना सांगतात तुम्ही एक अर्जाचा मसुदा आणा व आम्हीही एक तयार ठेवतो.परत जेव्हा ते मसुदा घेऊन आले तेव्हा भगतसिंहानी तुम्हचा मसुदा राहूदे असे म्हणत एक कागद पुढे केला. त्यांचे बोलणे होण्याआधीच पाठवलेल्या एका पत्राची ती प्रत होती.पंजाब गव्हर्नरला हे पत्र पाठवले होते. आम्हाला युद्ध बंदी मानले जावे आणि “फासावर चढवण्यापेक्षा बंदुकीच्या गोळ्यांनी उडवावे” अशी मागणी या वीरांनी या पत्रामध्ये केली होती.

भगतसिंह हे संपूर्ण भारतीय जनतेच्या आकांक्षांचे प्रतिक बनले होते.

” सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं।देखाना है जोर कितना बाजू ए कातिल में हैं।कल आने दो बता देंगे तुझे ए आसमाँ। हम उसे क्या बताएँ की क्या हमारे दिल में हैं।।”
सरकारला कोणत्याही परिस्थितीत त्यांना सोडायचे नव्हते, फाशीच्या शिक्षेबद्दल भगतसिंह यांचे स्पष्ठ मत होते, फाशीच्या तख्तावर चढुन त्यांना भारतातील सर्व तरुणानं समोर एक आदर्श निर्माण करायचा होता.साऱ्या देशात क्रांतीची मशाल पेटवायची होती. स्वातंत्राची प्रेरणा घरा घरात जागवायची होती.मानवीय आयुष्यात एक नवी चेतना निर्माण करायची होती.ही गोष्ट त्यांच्या या बलिदानाने साध्य होणार होती याची पक्की खात्री त्यांना होती.अशा वेळी फाशी पासून वाचवण्याचा कोणाचाही प्रयत्न त्यांना अमान्य होता.

अहिंसावादी म.गांधीजींनी आपल्या तत्वांच्या पलीकडे जाऊन फाशीची शिक्षा माफ करण्यासाठी प्रयत्न केले.

मार्च १९३० सविनय कायदेभग चळवळी बद्दल म. गांधीजी तुरुंगात होते.२६ जानेवारीला १९३१ ला सुटले.एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे भगतसिंह यांच्या फाशीच्या शिक्षेची तारीख आहे ७ ऑक्टोबर १९३० म.गांधी अजुन तुरुंगातच होते.पण या सर्व घडा मोडीवर त्यांचे बारीक लक्ष होते. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर लगेच म.गांधीनी लॉर्ड आयर्विन यांच्याशी चर्चा सुरू केली.प्रिव्ही कौसिलने फाशी शिक्षा माफ करण्याबाबत अपील केली.पण ती फेटाळली. १७ फेब्रुवारी१९३१रोजी परत भगतसिंहांची फाशीची शिक्षा कमी करावी अशी विनंती लॉर्ड आयर्विनला केली.
म. गांधीनच्या मते मृत्यूदंडाची शिक्षा कोणत्याही काळी व कोणत्याही स्थळी नैतिकदृष्ट्या योग्य नाही कारण त्यामुळे व्यक्ती मध्ये सुधारणा करण्याची संधी समाज गमावतो.५ मार्च १९३१ रोजी म.गांधी व लॉर्ड आयर्विन यांच्यात करार झाला या कराराप्रमाणे ज्या कैद्यानी हिंसक कारवायांत भाग घेतलेला नाही.त्यांची सुटका करण्यात आली.यात भगतसिंह यांचे नाव नसले तरी इतर लोकांची शिक्षे तील माफी त्यांना मिळवता आली.गांधीजी आपल्या मार्गानी भगतसिंहाना कशी माफी मिळेल या साठी प्रयत्न करीत होते. म.गांधीजी आपणास माफी मिळावी या साठी प्रयत्न करीत आहेत असे कळल्यावर भगतसिंह यांना काळजी वाटू लागली.भगतसिंह यांच्या काळजीतच म.गांधीजींचे प्रयन्त दिसून येतात.
१९ मार्चला म.गांधीजींनी आयर्विन यांची पुन्हा भेट घेतली आणि या भेटीत पुन्हा एकदा शिक्षा माफ करावी असा आग्रह धरला त्यामुळे देशातील वातावरण सुधारेल असे ते म्हणाले.२२-०३-१९३१ रोजी म. गांधींनी व्हाईसरॉयान समोर फाशी माफी बद्दलचे काही मुद्दे मांडले. अखेर सरकार ने त्यांना २३ मार्च ला घाई घाईत वेळेच्या आधी फासाववर लटकवले. नवजीवन मधील आपल्या लेखात म. गांधीजींनी म्हटले की मी माझ्या सर्व ताकदीनिशी भगतसिंह यांना वाचवायचा प्रयत्न केला पण सरकारने लोकमताचा मुलाहिजा न ठेवता त्यांना फाशी दिली.
“दिलसे निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत। मेरी मिट् टीसे भी खुशबू ए वतन आएगी।”
वन्देमातरम्
इन्कलाब जिदांबाद…..


संदर्भ:

१] भगतसिंह जीवन व कार्य (डॉ.अशोक चौसाळकर)
२]सरदार भगतसिंह (गणेश गोविलकर)
३]शहिद (कुलदीप नायर)
४]शहिदे आझम भगतसिंह (डॉ.वी.स.जोग)
५]इन्कलाब (मृण्लीनी जोशी)
६]शहिद भगतसिंह एक झंझावता (प्रकाश रेड्डी)
७]अमर शहिद भगतसिंह (वीरेन्द्र सिंधु)
८]भगतसिंह के विचार (पद्मालक्ष्मी)
९]शहिद भगतसिंह समग्र वाड्मय (दत्ता देसाई)

टिप : लेख पूर्ण वाचावा ही नम्र विनंती.

प्रमोद मांडे सरांची प्रतिकिया मिळावी एक आपली इच्छा. आजादी के दिवाने

लेख लिहण्यासाठी प्रेरणा देणारे आदरणीय दुर्ग अभ्यासक व इतिहास संशोधक श्री भगवान पा. चिले सर आपला मन: पूर्वक आभारी आहे.अभ्यासात वेळोवेळी मदत करणारे श्री सत्यजीत र. जाधव सर मन: पूर्वक आभार.करवीर नगर वाचनालय मध्ये असणाऱ्या आमच्या वाहिनी सौ. प्रिया सु.गायकवाड यांनी वेळोवेळी हवी असणारी पुस्तके उपलब्ध करून दिली. त्यांचे ही या ठिकाणी आभार.माझे शुद्ध लेखन व व्याकरण चांगले नाही.आम्हच्या बहना बाईनी कु.उज्वला सु.दुर्गुळे माझी पडती बाजु सांभाळून मद्दत केली तिचेही मन: पूर्वक आभार.

Ajinkya Gaikwad

I am preparing for civil services exam.i have completed my B.tech in Comp Sci from MIT A.bad.

Leave a Reply