Bhilare Guruji – The Man Who Once Saved Mahatma Gandhi

Bhilare Guruji ( Bhiku Daji Bhilare ) passed away yesterday. He was 98 years old. He was the one who captured Indias first Terrorist Nathuram Godse in the acts of assassination of Mahatma Gandhi in year 1944.

भिलारे गुरुजी गांधीवादी विचार आणि काँग्रेस पक्षाचे तत्त्वज्ञान प्रमाण मानून हयातभर सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले होते. येथील किसन वीर कारखान्याचे संस्थापक किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यचळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पाचगणीत वास्तव्य असताना नथुराम गोडसेपासून गुरुजींनी त्यांचे प्राण धाडसाने वाचविले होते. महात्मा गांधी यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेचे ते साक्षीदार होते. पांचगणीत महात्मा गांधी आले असता प्रार्थनेवेळी त्यांच्यावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नथुरामला पकडून भिलारे गुरुजींनी चोप दिला होता. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या उषा मेहता यांच्या पुस्तकात हा संदर्भ आहे.

Here we are presenting a few posts about him written on social media.


 

Few of us would know about Bhilare Guruji. He who restrained Nathuram Godse when he attempted to attack Gandhiji at Panchagani in 1944 passed away today.(18 .07.2017).
महात्मा गांधीजींवर पहिला अयशस्वी चाकु हल्ला करु पाहणा-या नथुराम गोडसेला जागीच आडवे पाडणा-या तरुणाचे आज निधन झाले. त्यांचे नाव “भिल्लारे गुरुजी”. त्यावेळेस नथुरामला बडवत असताना स्वत: गांधीजींनीच भिल्लारे गुरुजींना त्याला मारु नका ,सोडुन द्या असे सांगितले.
“भिल्लारे गुरुजींना” भावपूर्ण श्रद्धांजली !! “It was a wet July evening in Panchgani in 1944,” recalls Guruji, then a 25-year-old strapping taluka pramukh of the Rashtra Seva Dal. “All of us had assembled in the Batha high school hall for the evening prayers when suddenly a door opposite me opened and in rushed Nathuram Godse. He was wielding a knife and muttering incoherently.”
Barely had he gathered that Godse was about to kill Gandhiji than Guruji blocked his path and twisted the knife out of his hand. “My colleagues in the Seva Dal were also quick to react, and threw him out of the premises,” he recalls. Bhilare Guruji confidently says that Gopal Godse and Narayan Apte, who were later implicated in Bapu’s assassination, were present at the spot.

 

— Gyaneshwar Nigudkar

 


#दुःखद_घटना

गांधीजींना हल्ल्यापासून संरक्षण देणारे श्री भिलारे गुरूजी यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले.. इतिहासातील एक पान निष्राण झाले..

#जुलै_१९४४ मध्ये गांधीजी पाचगणीत असताना एके दिवशी पुण्याहून खास बस करून १८ ते २० माणसं आली आणि त्यांनी दिवसभर गांधीविरोधी निदर्शने केली. गांधीजींनी या गटाचा नेता नथुरामला चर्चेसाठी बोलावलं, न येता तो दिवसभर निदर्शने करीत राहिला.

संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी हातात कट्यार घेऊन हा माथेफिरू गांधीजींना मारण्यासाठी धावला, मणिशंकर पुरोहित आणि #भिलारे_गुरूजींनी त्याला अडवले, झटापट करून खाली पाडले आणि निशस्त्र केले.
नथुराम सोबत असलेले विष्णु करकरे, थत्ते, बडगे, गोपाळ गोडसे व इतर सर्वजण पळून गेले. चार वर्षानंतर गांधीहत्या कटात हे चारही जण सहभागी होते.

गांधीजींनी हल्लेखोराला मारहाण करू नका असं सांगितलं आणि उदारपणे त्याला सोडून द्यायला सांगितलं.
इथे पृथ्वीराज चौहान ने मोहम्मद घोरीला सोडून जी चुक केली होती तीच गांधीजींनी या माथेफीरूला सोडून केली.
आफ्रिकेत गांधीजींवर गोर्या लोकांचे जे हल्ले झाले, त्या सर्वांना गांधीजींनी असेच सोडून दिले होते. मीर आलम या पठाणाने केलेल्या हल्ल्यात खाली पडल्याने गांधीजींना दात गमवावे लागले. पुढे मीर आलम त्यांचा शिष्य झाला. पण पुण्यातील अहंकारी धर्मांध लोक शेवट पर्यंत आणि आजही काही लोक द्वेषच केला करत आहेत.

गांधीजींनी कधीही कुणावर कायदेशीर कारवाई केली नाही. ते म्हणायचे या लोकांना बहकावलं गेलंय म्हणून मी केस करणार नाही. पुढे बहूतांश सर्वांना पश्चाताप होऊन ते गांधीजींचे शिष्य बनले.

पण रानडे, फुले, टिळक, आगरकर, गोखले, शिंदे, कर्वे यांच्या सारख्या समाज सुधारकांचे, देशभक्तांचे वास्तव्य असलेल्या पुण्यातच जन्मलेल्या या माथेफीरूने महात्म्याची हत्या केली.

#भिलारे_गुरूजींना_भावपूर्ण_श्रध्दांजली _/\_

— Ajay Maktedar


 

सातारा जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी ( ९८ ) यांचे वृध्दापकाळाने भिलार ( ता महाबळेश्वर ) येथे पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता भिलार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
५५ कोटींचा विषयही नसताना महात्मा गांधींवर हल्ले झाले होते, याचा अखेरचा साक्षीदार गेला.
पांचगणीत महात्मा गांधी आले असता प्रार्थनेच्यावेळी महात्मा गांधी यांचे वर चाकु हल्ला करण्याचा प्रयत्न करणारया नथुरामाला पकडुन पाचगणीत नथुरामाला चोपणाऱ्या भिलारे गुरुजीं होते . ( संदर्भ – जेष्ठ गांधीवादी उषा मेहता यांचे महात्मा गांधी यांचेवरिल पुस्तक ) . भावपूर्ण आदरांजली .
या भिलार या गावचे नाव बदलण्याचे कारस्थान सध्या सुरू आहे जागोजागी पुस्तकाचे गाव असे बोर्ड लावून भिलारे गुरुजींचे गाव हे नाव मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे

— Rahul Pathak


 

जगन फडणीस यांचे महात्म्याची अखेर वाचले तेव्हा पहिल्यांदा भिलारे गुरुजींबद्दल कळले होते. महात्मा गांधी पाचगणीला होते. त्यावेळी नथुराम गोडसे गांधीजींना मारण्यासाठी जांबिया घेऊन तेथे गेला होता. गांधीजींना मारण्यासाठी त्याने जांबिया उगारला त्यावेळी भिलारे गुरुजींनी त्याचा हात पकडून जांबिया काढून घेतला होता. नंतर भिलारे गुरुजींनी त्याला चोप देऊन हाकलून लावले होते. ही गोष्ट फाळणी होण्याच्या खूप आधीची होती. ज्यावेळी 55 कोटींचा काहीही संबंध नव्हता. तरीही गांधींना मारण्याचे प्रयत्न झालेले होते. पुण्यातून हे हे प्रयत्न व्हावेत यामागे वंशवादी, जात श्रेष्ठत्त्ववादी विचारसरणी होती.

पुस्तक वाचल्यानंतर भिलारे गुरुजी हयात आहेत इतकेच कळले होते. परंतु त्यांचा पत्ता ठाऊक नव्हता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. हिंदुत्ववाद्यांचा उन्माद वाढला आणि नथुरामचे खुलेपणाने उदात्तीकरण त्यांनी सुरू केले. नथुरामचे पुतळे तयार करून स्मारक तयार करण्याची भाषा सुरू झाली. त्यावेळी मात्र भिलारे गुरुजींची मुलाखत असलेली एखादी डॉक्युमेंटरी असावी असे तीव्रतेने वाटू लागले होते. मोहिनीशी (Mohini Karande) त्याबद्दल बोलणेही झाले होते.

त्याच दरम्यान भिलारला पुस्तकांचे गाव हा प्रकल्प सरकारने सुरू केला. ते भिलार हेच भिलारे गुरुजींचे गाव. पुस्तकांच्या गावाचे रिपोर्टिंग करण्यासाठी भिलारला गेलो त्यावेळी भिलारे गुरुजींच्या नातेवाईकांशी भेटही झाली होती. त्यांच्याशी बोलल्यानंतर गुरुजी मुंबईला असतात असे कळले होते. त्यावेळी गुरुजींचा पत्ता आणि फोन नंबरही मिळाला होता. ते 99 वर्षांचे असल्याने खूप थकले असल्याचेही कळले होते. गुरुजी त्या भागाचे आमदार होते. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे त्यांच्या भागात केलेली आहेत. त्यांचा गौरवग्रंथही पाहण्यात आला होता. त्यातून त्यांनी केलेल्या कामाची माहिती कळाली होती.

एकदा त्यांच्याशी बोलावे म्हणून फोनही केला होता. मात्र त्यांना काही नीट आठवत नाही म्हणून ते नीट माहिती देऊ शकत नाहीत असे त्यांच्या नातूने सांगितले. काही दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यात वय झाल्याने ते स्मृतीही नीट नव्हती. त्यामुळे आमचा डॉक्युमेंटरी बनवण्याचा बेत बारगळला. आज गुरुजींच्या निधनाची बातमी कळली. एका मोठ्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी आज काळाच्या पडद्याआड गेला. भिलारे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली

 

— Rahul Borse

 


 

1942 ला, 55 कोटी,फाळणी,निर्वासित इ. गांधीहत्त्येच्या समर्थनार्थ सांगीतली जाणारी तद्दन तकलादू आणि खोटी कारणं अजिबात अस्तित्वात नव्हती.तरीही गोडसे,बडगे,थत्ते,करकरे,इ.नी पाचगणीत गांधीजींविरुद्ध दिवसभर निदर्शने केली. गांधीनी मोठ्या मनाने त्यांना चर्चेला बोलावले असता नथू गोडसेने त्यांच्यावर चाकूहल्ला केला. तेव्हा भिल्लार येथील भिल्लारे गुरुजी या तरुणाने त्यांना वाचवले आणि नथूची धुलाई केली. गांधींनी त्यांना सोडून द्यायला सांगितलं तेव्हा उदार अंतकरणाने माफ करुन सोडून दिले.गांधीजींनी सांगीतले म्हणून पोलीस तक्रार पण केली नाही.पुढे याच पुणेरी अतिरेक्यांनी गांधीजींची हत्या केली.
या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असलेल्या, भिल्लारे गुरुजींचे आज वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. आज त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र हळहळत आहे.श्रद्धांजली वाहत आहे.
आतातरी,आजही नथूचा अंश मनात वाढवत,द्वेषाचा वणवा पेटवण्याचे विफल प्रयत्न करणारे,खोट्यानाट्या प्रचाराला बळी पडलेले,आमचे हे वाट चुकलेले बांधव अंतर्मुख होऊन काही विचार करतील की नाही? आपला विषाक्त विचार सोडून खर्या मानवतावादी मार्गावर येतील की नाही?
भिल्लारे गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली

— Dr. Arun Mankar

 


 

त्त्यांची भेट राहिली ती राहिलीच
9ऑगस्टला सोबत कार्यक्रम ठरला होता पण तत्पूर्वी गुरुजी गेले
#दुःखद_घटना

महात्म्याला वाचविण्याचे महान कार्य करणाऱ्या भिलारे गुरुजींचे बुधवारी काल पहाटे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले.

येत्या 9 ऑगस्ट रोजी बालगंधर्व येथे आपण आयोजित केलेल्या मा. तुषार गांधी आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या एकत्रित संवाद आणि माझ्या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात भिलारे गुरुजींचा गौरव करून युवा पिढीला त्यांची ओळख करून देणार होतो पण तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
आम्हाला उशीर झाला
वाई येथील स्नेहसंमेलनाच्या वेळी ही भिलार गावी जाऊन त्त्यांची भेट घेणे राहिले ते राहिलेच

स्वातंत्र्यपुर्व काळात जुलै_१९४४ मध्ये पाचगणी येथे प्रार्थनेवळी स्वत:चा जीव धोक्‍यात घालून महात्मा गांधींवर हल्ला करणाऱ्या नथुरामच्या हातातील सुरा समय सूचकतेने व निर्भयपणे भिलारे गुरूजींनी हिसकावून घेतला होता. हे प्रसंगावधान दाखविले नसते तर अनर्थ झाला असता.

(भिलारे गुरुजी यांनी ब्रिटिशांच्या काळात भूमिगत प्रतिसरकार मधून स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, १९६२ ते १९८० अशी तब्बल १८ वर्षे ते आमदार होते.)

यानिमित्ताने काही गोष्टी पुन्हा मांडाव्या वाटतात त्या अश्या
गांधीजींनी त्याही वेळेस नथुरामला चर्चेसाठी बोलावले होते पण तो कधीही चर्चेसाठी आला नाही, विचारांचे उत्तर गोळ्यांनी देणाऱ्यांचा संवादावर विश्वास नसतोच मुळी

आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा 55कोटी, फाळणी किंवा इतर कोणतीही गोष्ट झालेली नव्हती
गांधीजींनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण या सर्व पातळीवरील कुणा एका वर्गाची मक्तेदारी संपवून ते सर्व जातीं आणि वर्गासाठी सर्वसमावेशक केले याचा राग त्त्यां वर्गाच्या मनात होता

जगन फडणीसानी लिहले आहे
महात्मा गांधी विषयी या हिंदुत्ववाद्यात द्वेष होता व आहे , तो एखाद्या च्या व्यक्ती द्वेषा सारखा नाही. गांधीच्या विचाराने हिंदुत्ववाद्याच्या विचाराला रोखले आणि त्यांच्या राजकारणाला पायबंद बसला म्हणुन गांधीविषयी द्वेष होता . हिंदुत्ववादी ज्या वर्गातुन आले तो वर्ग पेशवाई संपल्यापासुन सत्तेवरुन फेकला गेला होता.टिळकांच्या राजकारणामुळे त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. त्या गांधीच्या पाजकरणाने करपुन गेल्या .म्हणुन हिंदुत्ववाद्याच्या गांधीच्या विचारसरणीवर द्वेष होता.त्यातही पुण्याचा ब्राम्हणवर्ग होता . त्यांच्यापैकी काहीजण हिंदुत्ववादी होते. मग मुंबई च्या हिंदुत्ववाद्यांचा गांधी द्वेष पुण्याच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा कमी का? याचाही विचार केला पाहिजे आणि तो विचार केल्यास असे लक्षात येईल कि, संभाजीच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण ब्राह्मणांच्या हातात गेले होते ते पेशवाई बुडेपर्यंत आणि टिळकांच्या काळात ब्राम्हणाकडे राजकारणाची सुत्रे होती .त्यामुळे पुण्यातील ब्राम्हणांनी काळानुरुप बदलण्याचे नाकारले. ते त्यांना जमले नाही. पेशवाई गेल्यानंतर राजकारणाच्या हालचाली मुंबईत केंद्रित झाल्या .मुंबईत हिंदु मुस्लिम ,पारशी यांच्या व्यवहारात सरमिसळपणा होता. पुण्याप्रमाणे मुंबईत ब्राम्हणांचे वर्चस्व राहिलेले नव्हत. तसेच मुंबईत ब्राम्हण वर्ग पुण्याप्रमाणे एकजिनसी राहिलेला नव्हता .टिळकांसारखा नेता च्या ऊदयास आल्यावर पुण्यातील ब्राह्मण वर्गााला जी आशा वाटत होती तिलाच धक्का बसला .त्यातुन गांधी द्वेषाचे राजकारण सुरू झाले.सर्वच ब्राह्मण गांधीद्वेष्टे नव्हते नव्हते. केळकर ,खापर्डे यांच्यासारखी मंडळी दुर राहिली तरी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ, आचार्य जावडेकर, आचार्य स.ज. भागवत अशी कितीतरी मंडळी ब्राम्हणी मंडळी गांधीच्या प्रभावाखाली आली. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचे पित्त आणखीच खवळले. ब्राम्हणवर्गातील काहींनी गांधी विचारसरणी स्वीकारली. पण ज्यांनी नव्या बदलास सामोरे जाण्याचे नाकारले ते कट्टर हिंदुत्ववादी बनले आणि द्वेषाने अंध झाले. नवे विचार व नवे राजकारण यांचा दैदिप्यमान प्रकाश पाहुन त्या प्रकाशाचा स्वीकार करण्याऐवजी त्यांनी स्वतःचे डोळेच म त्यांनी मिटुन घेतले. ज्या गांधीमुळे हा प्रकाश पडला होता त्या प्रकाशाचेच ते विरोधक बनले आणि गांधींना ठार मारल्याशिवाय त्यांचा विचार रोखता येणार नाही या विचाराप्रत ते आले .विचारांचा मुकाबला विचाराने करण्याईतका प्रभावी विचार हिंदुत्ववाद्यांजवळ नव्हता .तसेच प्रभावी नेतृत्वही त्यांच्याजवळ नव्हते . जुन्या विचारांचा टिकाव लागत नाही आणि नव्या विचारांचा बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही. त्यावेळी अशीच विकृती तयार होते.

— Sanket Munot

 


 

One thought on “Bhilare Guruji – The Man Who Once Saved Mahatma Gandhi

  • December 12, 2017 at 3:02 am
    Permalink

    It is really appreciable to initiate this activity for knowing and spreading thoughts of Gandhiji.

    Reply

Leave a Reply

%d bloggers like this: