साप्ताहिक गांधी प्रश्नमंजुषा – Gandhi Quizzes

साप्ताहिक गांधी प्रश्नमंजुषा
Gandhi Quizzes
10 December 2017

निकाल/Result

निकाल जाहीर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. खरे तर आपला भरभरून मिळालेला प्रतिसाद व एकाचढ एक अशी उत्तरे यांमुळे निकाल तयार करणे केवळ एक आव्हान होते. तरीही त्यातल्या त्यात निकाल सादर करत आहोत. सुरुवातीला फक्त पाच सर्वोत्कृष्ट स्पर्धकांची नावे जाहीर करण्याचे ठरले होते, पण चुरस एवढी वाढली की तब्बल पंधरा जण विजेते ठरत आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन व सर्व सह्भागीना धन्यवाद!

 

💐💐💐💐💐💐💐

1. श्रीकांत तापडे/Shrikant Tapade 15/15

2. भुजंग बोबडे/Bhujang Bobade 15/15

3. अनंत कदम/Anant Kadam.15/15

4. राजन नेवगी/Rajan Newagi 15/15

5. संदीप पाटील/Sandeep Patil 15/15

6. सुशील फत्तेपुरीया/Sushil Fattepuriya 15/15

7. रोहन मुथा/Rohan Mutha 15/15

8. जितेंद्र सहाळा/Jitendra Sahala 14/15

9. यशवंत शिपे/Yashwant Shipe 14/15

 

10. संकोल तरहाल/Sankol Tarhal 14/15

11. सुरेंद्रकुमार घाडगे/Surendrakumar Ghadge 14/15

12. वरद पाठक/Varad Pathak 14/15

13. पुष्कर बुवा/Pushkar Buwa 14/15

14. प्रसाद झोरे/Prasad Zore 14/15

15. प्रवीण खेडकर/Pravin Khedkar 14/15

सर्वांना पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you!
Knowing Gandhism Global Friends आणि चांगले विचार समूह.

 

A few thoughts shared by our participants

“Mahatma Gandhi inspired the world with his faith in truth and justice for all Mankind. He was a great soul who loved even those who fought against his ideals to bring about peace with non-violence.The force of power never wins against the power of love. At this hour of greatest unrest and turmoil in our world, the greatest force to be reckoned with lies within our hearts a force of love and tolerance for all. ”
– Samarth Pawar

“Gandhi is not only name this is ideology and guidance how to react in critical situation. He started struggle for humanity (not only for independence ) in 1895 from africa 1948 he never get advantage of publicity and nor celebration of victory at independence day people are celebrating day and he was working for peace in naukhali and tiprah. Today people talk against gandhi fir his attitude towards neharu and bose is different but they don’t know bose started INA battalion by the name of gandhi and neharu.. today people debating on the title ‘father of nation’ i think the meaning of this title is like our original father he teaches us the meaning of life and shows the path for truth and peace today at global level people like trump and kim jong are distribing global peace in that condition only gandhism is only solution… Jai hind”
– Rahul Jagtap

“His teaching that I like the most is “Practice before you preach”. It is more important to be a man of actions rather than mere words. This is the only way one can find his/her opinions, thoughts and advices being respected and obeyed. One who is does not follow his own teachings is often treated with disregard. One of the reason why people seriously followed Gandhi’s teachings was that he himself practiced what he preached and only then found himself worthy of giving any advice or opinion. ”
– Shikha Rajput

“Mahatma Gandhi was man of action. He always spoke truth and accepted the mistakes that he committed. Truth is salvation for him and non-violence is path. He showed love and affection towards his opponent. He never called them ‘enemy’. He gave primacy to means over end. He believed in self- suffering to change the mind of his critics. He created ‘war of position’ in the mind of millions of Indians by giving confidence. He gave utmost importance to cleanliness. Finally, he was liberator of oppressed women and frontrunner in freedom movement. ”
-Abhijeet Rasal

“‘ Rashtrapita Mahatma Gandhi ‘ the name itself indicates the uniqueness of the personality and name. As I follows the thought of Gandhiji it becomes very very useful in my day to day life..and thoughts like…never lie…never support injustice… Always help needy people… Patriotism …trueness in world’s and act…as I read his struggle for the freedom..I salute to his thought and thinking power… Hi was very passionate…his positive attitude towards life..which is very useful in our day to day life also…if everyone will follow his thoughts not for society but only for his or her own life….then automatically society will improve itz thought ..itz culture and everything… I support gandhisam…cause itz not indicate any religion… Any caste…any particular thought process but only says us to avoid violence and keep peace…. That’s more important for the democratic country to maintain our own incredible status in the world…JUST NEVER LIE its the most important teaching of Mahatma Gandhi…he is always being my role model …my ideal… And the inspiration… I again salute to him and his thought.”
– Snehal Gaikwad

“Iradication of casteism / religion is the most important preaching of Gandhiji. Casteless, religionless society is the need of the hour. Looking at the current scenario people are behaving erratically and social unrest is on the rise. If there is social unrest the country’s economy will not progress. And as a result the huge manpower will remain unemployed. The casteism and religious fanatism is also killing people in the name of “dharm”. Humanity should be above all the religions.”
– Vikram Deshmukh

“मोहनदास करमचंद गांधी ज्यांनी आपल्या आयुष्यात गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचे खऱ्या अर्थाने पालन केले ते म्हणजे ‘आशा हे दुःखाचे मूळ कारण आहे’. आपल्या स्वतःच्या मूलभूत गरजांपेक्षा जास्त वस्तू, संसाधनांचा वापर हेच आजच्या सर्व भौतिक दुःखाचे मूळ कारण आहे आणि याबद्दल गांधीजींनी आपल्या ‘मंगल प्रभात’ व ‘हिंद स्वराज्य’ या पुस्तकात लिहले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एक केवळ त्यांचे ध्येय न्हवते तर मानवतेच्या तत्वावर आधारलेले ‘सुराज्य’ त्यांना हवे होते. गांधीजींची हि असतेय व मानवतेची शिकवण मला सर्वाधिक प्रिय आहे.”
– Bhujang Bobade

“असहिष्णुता आणि मूलतत्त्ववाद फोफावत असल्याच्या आजच्या काळात महात्मा गांधी यांची शिकवण आजही कालसुसंगत ठरते.
गांधीजींचे विचार स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात जितके कालसुसंगत होते तितकेच ते आजही आहेत. त्यांची महत्त्व आणि त्यांची व्याप्ती जराही कमी झालेली नाही, साधी राहणी, अहिंसा, साधनशुचिता ही गांधीजींची शिकवण आजही जगाला विनाशाच्या खाईत जाण्यापासून रोखू शकते.”
– Jitendra Sahala

“हातात शस्र असणाऱ्याला तर सगळेच घाबरतील पण हातात कोणतही शस्त्र नसताना एवढ्या बलाढ्य इंग्रजांना फक्त बापुच घाबरवत होते तसेच,
जग वाचवायच असेल तर अहिंसेशिवाय पर्याय नाही हि शिकवण बापुजींनी स्वतः च्या “नैतिकते” मधून दिली आहे ”
– Samadhan Aher

“कुठलाही अन्याय निमूटपणे सहन न करता त्याविषयी शांततेच्या मार्गाने आवाज उठवावा कारण अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा जास्त दोषी असतो.पण बंड पुकाराने म्हणजे फक्त काही रक्ताची क्रांती नाही त्यासाठी त्यापेक्षा चांगला आणि शक्तिशाली असा सत्याग्रह हा उपाय आहे. कारण आपलं वैर कुना व्यक्तीशी नसत तर त्याच्या आतील वाईट गुणांशी किंवा अन्यायी प्रवृती शी असत.त्यामुळे त्या व्यक्तीशी संघर्ष न करता त्या वाईट प्रवृत्ती शी करावा.आणि गांधीजींचा परिवर्तनावर विश्वास होता.त्यामुळे समोरच्याच्या आतील वाईट प्रवृत्ती दूर करून त्याच्यात आणि पर्यायाने समाजामध्ये परिवर्तन घडवून आणायचा प्रयत्न करावा.गांधीजींची हि शिकवण मला खूप भावते.”
– Pravin More

“गांधीजी मानवतेवर प्रचंड विश्वास ठेवत होते. शिक्षण केवळ अक्षर ज्ञानाने येत नाही, निरक्षर व्यक्तीही समाजाच्या भल्यासाठी विचार करू शकतो, याच विचारातून त्यांनी लक्षावधी अशिक्षित भारतीयांना सुशिक्षित भारतीयांच्या बरोबरीने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. तत्कालीन समाजावर पगडा असलेल्या उच्चवर्णीय मानसिकतेला उलथवून समतापूर्ण विचार प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारानेच संविधानात सर्वधर्मीय आणि सर्वजातीयांना समानतेचा अधिकार दिला. बहुसंख्यांक समाजात अल्पसंख्यांकांचे स्थान महत्त्वपूर्ण असते, त्यांना सुरक्षित वातावरणात जगता येईल, याची जबाबदारी बहुसंख्यांकांची असते हा महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि जोपासला, ज्याचा प्रसार-प्रचार करण्याची आवश्यकता आहे. ”
– Varad Pathak

“महात्मा गांधींचे जीवनच एक संदेश आहे….सार्वजनिक जीवनात राहताना जी पथ्य त्यांनी पाळली त्याला तोड नाही….त्याच जोरावर त्यांनी संपुर्ण जनतेला आपलेसे करुन घेतले…..गांधीच्या एका इशार्यावर लोकांनी शाळा सोडल्या, नोकर्या सोडल्या एवढेच काय तर लोक मरायलाही तयार झाले…..हे निष्कलंक चारित्र्याची कीमया आहे….जनतेचे दुःख आपलेसे करुन घ्यायला साहस लागते….आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्य त्यागण्याची तयारी पाहीजे.”
– Ojas More

“गांधींचे जीवन एक सामान्य विद्यार्थी म्हणून सुरू झाले. परंतु कोणत्याही परिस्थितीत सत्याशी प्रतारणा करायची नाही, निर्भयता, आत्मपरीक्षण, आत्मसंयम या तत्त्वांनी त्यांना असामान्य बनवले. आपल्या विरोधकाला शत्रू कधीही मानले नाही. जे गुण दैवी, आध्यात्मिक, विशेष नैतिक मानले जातात त्यांचा स्वतःच्या जीवनात, व्यवहारात उत्तम संगम केला व तोच आदर्श इतरांच्या पुढे ठेवला. व्यवस्था बदलापेक्षा माणूस बदलण्यावर त्यांचा विश्वास होता.”
– Pralhad Mistri

“महात्माजींची मला सर्वात आवडलेली शिकवण म्हणजे त्यांचे धार्मिक विचार.गांधींजींच्या धार्मिक विचारांचे मूलसूत्र हे आपल्या इथल्या कट्टर धर्मवाद्यांना कधीच समजलेच नाही.खरेतर गांधीजी म्हणजे धार्मिक,सामाजिक विचारांचे स्वतंत्र असे विश्वविद्यालय आहे.त्यांच्या धार्मिक विचारांचा मुलगाभा हा ” माझा धर्म जितका खरा आहे तितकेच सर्व धर्म खरे आहेत “. स्वधर्माचा कट्टर अनुयायी होण्यासाठी इतर सर्व धर्मांचा आदर करणे आवश्यक आहे,ही त्यांच्या धार्मिक विचारांची पूर्वअट होती.खरे तर त्यांच्याइतका कट्टर हिंदू धर्माचा अनुयायी होणे दुरापास्त आहे.त्यांचा धार्मिक विचार हा सर्वसामावेशी होता.एखादा व्यक्ती कट्टर हिंदू होण्यासाठी त्याला सर्वप्रथम इस्लाम,ख्रिश्चन ,गुरु नानकसाहेब यांचे विचार आधी ग्रहण केले पाहिजे.इतर सर्व धर्मांचा आदर करणे हे स्वधर्माचा कट्टर अनुयायी होण्यासाठीची पूर्वअट आहे.आपल्या इथल्या कट्टर धर्मवाद्यांना गांधींजींची ईतर सर्व धर्मावरील निष्ठा ही डोळ्यातील काट्याप्रमाणे सलत असे.म्हणून त्याची परिणीती ही गांधीजींना संपवण्यात झाली.गांधींजी हा विचार आहे तो खून करण्याने संपणार नाही.”
– Anil Bhure

“There are many stories of him I have been listening from my childhood. some of which probably influenced me the most are as follows
1. मनसा-वाचा-कर्मना – Somewhere I listened to this story. Though at that time, there were people in the country who were more intelligent than the Mahatma but why people followed him? Why people gathered to listen to him? It was because he always said what he felt right and he always did what he said.
2. The second one is – Never preach what you can’t follow. A mother took her son to Gandhi and complained about his eating lot of jaggery. She requested Bapu to convince him no to. Bapu told her to come after a few days. When she came after a few days, Bapu talked to son, tried to convince him not to eat lot of jaggery. The mother was surprised and asked if you were only to say this why didn’t to say it on that itself. Mahatma Gandhi said – because I myself was eating jaggery then. I quit it first. How can I tell him to do something that I myself cannot do.
And above all, his love for truth reins above all.”
– Parikshit Suryavanshi

“An eye for an eye will make the whole world blind.
बापूंच्या ह्या शिकावणुकीचा गर्भर्थ लक्षात आल्यावर माझ्यातील माझ्या तारुण्यातील उसळणाऱ्या रक्ताच्या सळसळतेपणावर मी ताबा मिळवण्यासाठी अत्यावश्यक असा तार्किक वाद मला प्राप्त झाला. समोरचा जर माझ्याबरोबर चुकीचा वागत असेल तर मी बरोबर वागण्याने काय फरक पडणार, या वृत्तीचा मी प्रथम होतो. परंतु त्या व्यक्तीमध्ये आणि माझ्या मध्ये नैतिकदृष्ट्या काहीच भेद नसणार याची पूर्वानुभिनीती बापूंच्या सदर शिकवणुकीमुले मला प्राप्त झाली. तसेच सदर तत्वांचे अनुसरण करत असताना “माफी देण्यासाठी शक्तिशाली मनाचे गरज असते, कच्या मनाचे सूडाची भाषा करतात” हाही माझ्या पूर्वाश्रमीच्या जीवनातील विचारमूल्यांना एक खूप मोठा सुखद धक्का होता. वरील दोन्ही शिकवणींची माझ्या तद्नंतरच्या आयुष्यत मला माणूस म्हणून चांगले जीवन जगताना खूप मकठी मदत झाली आहे.”
– Dhanraj Bhosale

“गांधी हीच जागतिक अहिंसेची ओळख आणि गांधी हीच सहिष्णू भारतीयत्वाची जागतिक ओळख.
गांधीना ना जातिच्या मर्यादा होत्या ना धर्माच्या. गांधींना ना राज्यांच्या मर्यादा होत्या ना देशांच्या. तत्कालिन भारतीयांना जहाल आंदोलनातून मवाळ आंदोलनात सक्रिय करून एकाच छत्राखाली आणणारा मसीहा म्हणून हा देश गांधींचा कायम ऋणी राहील. भारतीयांना; देशासाठी कोणाला मारण्यापेक्षा देशासाठी मरणे शिकवणारा अहिंसेचा हिंस्र प्रचारक म्हणजे गांधी आणि त्यांच्या एका शब्दावर मरायला तयार असणारे लाखो लोक. ह्यासाठी व्यक्ती मध्ये संपूर्ण मनाची शुद्धता आणि पवित्रता लागते जी भारतीयांना गांधीजींमध्ये दिसून आली .
अहिंसा परमो धर्म 💐”
– Rohan Mutha

Questions and Answers

1. गांधीजींना सर्वप्रथम तुरुंगवास किती साली घडला? When was Gandhi ji went to jail first time?
*

1895

1903

1908✔✔

1917

2.  गांधीजी 1924 साली —– येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते/Gandhiji was president of Congress session held at ___ in 1924
*

बेळगाव/Belgaum✔✔

मुंबई/Mumbai

कराची/Karachi

लखनौ/Lucknow

3.  जालियनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीजींनी कोणत्या पदवीचा त्याग केला?/After Jalianwala Baug massacre, which title was abandon ed by Gandhiji?
*

सर/Sir

कैसर-ए-हिंद/Kaisar-e-hind✔✔

बॅरिस्टर/Barrister

रावबहादूर/Raobahadur

4. गांधीजींना सर्वप्रथम ‘महात्मा’ म्हणून कोणी संबोधले?/Who called Gandhiji as ‘Mahatma’ first time?
*

वल्लभभाई पटेल/Vallabhbhai Patel

जवाहरलाल नेहरू/Jawaharlal Nehru

सुभाषचंद्र बोस/Subhashchandra Bose

रवींद्रनाथ टागोर/Ravindranath Tagore✔✔

5. गांधीजींनी त्यांचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत लिहिले?/In which language wrote his Autobiography by Gandhi ji?
*

इंग्रजी/English

हिंदी/Hindi

गुजराती/Gujrati✔✔

फारसी/Persian

6. खालीलपैकी कोणते गांधीजींच्या सात पापांमध्ये समाविष्ट नाही?/Which of the following is not included in seven sins of Gandhiji?
*

कष्टाशिवाय संपत्ती/Wealth without work

संघर्षाशिवाय स्वातंत्र्य/Freedom without struggle✔✔

नैतिकतेशिवाय व्यवसाय/Business without morality

त्यागाशिवाय धर्म/Religion Without Sacrifice

7. खालीलपैकी काय गांधीजींच्या एकादश व्रतांत समाविष्ट नव्हते?/Which of the following was not included in eleven vows of Gandhiji?
*

स्वदेशी/Swadeshi

अस्वाद/Aswada

खादी/Khadi✔✔

निर्भयता/Fearlessness

8. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?/Who was the leader of Mulshi Satyagraha?
*

सेनापती बापट/Senapati Bapat✔✔

साने गुरुजी/Sane Guruji

विनोबा भावे/Vinoba Bhave

नाना पाटील/Nana Patil

9. सकाळी फिरायला जाताना तुम्हाला तुमच्या आदर्श व्यक्तीच्या पुतळ्याची विटंबना झालेली दिसली. तुम्ही काय कराल? While on morning walk, you saw a statue of your role model detracted. What will you do?
*

गावातील दुकानदारांना बंद पाळण्याचे आवाहन करील/will appeal the shopkeepers in the town to observe Bandh

पोलिसांना झालेल्या प्रकारची माहिती देईन/Will inform to the police about incident.✔✔

संभाव्य दोषींविरुद्ध घोषणाबाजी कारेन/will abuse against potential culprits

काहीही करणार नाही, तसाच पुढे निघून जाईल/will not do anything and go ahead on my way

10. तुम्हाला तुमच्या बॉसकडून त्रास सहन करावा लागत आहे, तुम्ही काय कराल?/You are facing hardships from your boss. What will you do?
*

त्रास निमूटपणे सहन करीन/Will suffer quietly

बॉसबरोबर होणाऱ्या त्रासाबद्दल चर्चा करीन व त्यावर चर्चेतून उपाय शोधीन/Will discuss with boss about hardships and find the way through discussion✔✔

ती नोकरी सोडून देईन/Will quit that job

बॉसला नीट वागण्याविषयी धमकी देईन/Will threaten the boss to behave properly.

Leave a Reply