मोहनदास ते महात्मा प्रश्नमंजुषा/Mohandas to Mahatma Quizzes

Knowing Gandhism Global Friends आणि चांगले विचार समूह आयोजित

मोहनदास ते महात्मा प्रश्नमंजुषा/Mohandas to Mahatma Quizzes

प्रवासी भारतीय दिन
मंगळवार, 09 जानेवारी 2017

निकाल/Result

प्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘मोहनदास ते महात्मा’ प्रश्नमंजुषेचा निकाल जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या प्रश्नमंजुषेचा मिळालेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आणि सर्वच सहभागीनी अगदी हृदयापासून व उत्कृष्ट स्वरूपाची दिलेली उत्तरे यांमुळे निकाल तयार करणे गे एक आव्हानात्मक काम होते. आपण वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरे इतकी सुंदर दिलीत की त्यांना भरभरून गुण देणे भागच होते. प्रश्न क्रमांक 10 च्या संदिग्ध भाषेमुळे तो प्रश्न रद्द केला आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन निकाल तयार केला आहे. त्याआधारे पुढील पाच जण रोख परितोषिकासाठी पात्र ठरले आहेत:

1. प्रसाद झोरे/ Prasad Zore: 23 गुण

2. ऋषिकेश वसू/Rushikesh Wasu: 23 गुण

3. श्रीकांत पाटील/Shrikant Patil: 22 गुण

4. तेजल देवरे/Tejal Deore: 22 गुण

5. विजय भंडारे/Vijay Bhandare: 22 गुण

याचप्रमाणे पुढील चार जण प्रत्येकी 22 गुण मिळवून विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत. आधी ठरल्याप्रमाणे जर टाय झाला तर रोख बक्षिसासाठी कालानुक्रमे प्रवेशिका विचारात घेतल्या आहेत. त्यामुळे सदरील चार जणांना रोख बक्षिसासाठी पात्र ठरता आले नाही. परंतु त्यामुळे त्यांच्या कामगिरीत कुठलाही कमीपणा येत नाही, त्यांची कामगिरीही तितकीच कौतुकास्पद आहे असे आम्हाला वाटते.

1. सुरेंद्रकुमार घाडगे/Surendrakumar Ghadage

2. भुजंग बोबडे/Bhujang Bobade

3. श्रुतिका चकूले/Shrutika Chakule

4. योगेश सांगळे/Yogesh Sangale

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपणा सर्वांनी वेळात वेळ काढून सहभाग नोंदवलात, त्याबद्दल आपण सर्वच अभिनंदनास पात्र आहात. आपली गांधीविचारांप्रति असलेली रुची अधिक वृद्धिंगत होवो व आपल्या हातून समाजासाठी भरीव कार्य घडो या शुभेच्छा!

पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन!💐💐💐💐💐
पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण यासंबंधी लवकरच सूचित करण्यात येईल👍🏻
काही प्रश्नांमुळे उडालेल्या गोंधलंबद्दल दिलगीर आहोत. झालेल्या चुका आपण मोठ्या मनाने पदरात घ्याल ही अपेक्षा!🙏🏻🙏🏻🙏🏻

धन्यवाद!

आपले नम्र
Knowing Gandhism Global Friends आणि चांगले विचार समूह

मोहनदास ते महात्मा प्रश्नमंजुषा/Mohandas to Mahatma Quiz Competition

प्रवासी भारतीय दिन
मंगळवार दि. 9 जानेवारी 2018

आयोजक:
Knowing Gandhism Global Friends आणि चांगले विचार समूह

Few words shared by our Participants:

अ) गांधीजींची स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात कशी आणता येईल?/How can Gandhiji’s concept of self-sufficient village be brought in reality?

“नुकताच नगर जिल्ह्यात जाण्याचा योग आला आणि खेड़े नाही पण दोन विकसित गावे पाहून हे कार्य भारतातल्या सर्व खेड्यांत झाले तर? असा विचार मनाला स्पर्शून गेला. कारण आपला देश विविध खेडयांचे प्रतिनिधित्व करतो. आजही जास्तीत जास्त भारतीय खेड्यात निवास करतात. मग अशा वेळी गांधीजींनी घातलेली ‘खेड्यांकडे चला’ ही साद आठवते. खेड्यांकडे जाऊन त्यांना शहरां सारखं कुरूप करण्यासाठी नव्हे तर त्यांचा शाश्वत विकास व्हावा आणि जागतिक पातळीवर पूर्वीसारख़्ंच भारत पुन्हा एकदा सशक्त देश बनवा म्हणून..
या स्वयंपूर्णतेच्या कसोटीत अवलंबविता संपविणे, उर्जेचा योग्य वापर करणे, सांड़पाणी निचरा, पाणी साचविणे, प्रत्येक मुला मुलीस शिक्षण यांचा समावेश होतो. शाश्वत शेती, उर्जेचा पुनर्वापर, निसर्गाची जपणूक इ. गोष्टी खेड्यांचा अविभाज्य भाग असल्या पाहिजेत. इतर काहीही बनण्या आधी एक उत्तम नागरिक बनून आपले जीवन विकासाला सुपूर्द केल्यास हे सहज शक्य आहे, मग गांधीजींच्या कल्पनेतील स्वयं पूर्ण खेड्यांचा टप्पा प्रत्यक्षात देखील दूर नाही..”
– Tejal Deore

 

“खेड्याकडे चला” या गांधीजींच्या संदेशातूनच आपणास स्वयंपूर्ण खेड्याच्या संकल्पना लक्षात येते, लोक रोजगारासाठी तसेच सेवांसाठी शहराकडे स्थलांतरित होतात त्यामुळे खेडी ओस पडतील, यासाठी शहरातील सर्व सुख सुविधा तसेच रोजगाराच्या संधी ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे, यासाठी सरकारकडे नवीन योजना सुरु करणे (उदा. रोजगार हमी योजनेसारख्या योजना अस्थित्वात आणणे , ग्रामोद्योगाना चालना देणाऱ्या योजना) तसेच शाळा , महाविद्यालये , दवाखाने , वीज, रस्ते, इंटरनेट व बाजारपेठा या ग्रामीण भागात तयार झाल्या तर अन्न, वस्त्र, निवारा, या मूलभूत गाजप्रमाणेच अत्यावश्यक सेवाही ग्रामीण भागात मिळू शकतात त्यामुळे त्या खेड्यातील माणसांना उत्पादनापासून विक्री पर्यंतच्या सर्व सेवा व योजना खेड्यातच मिळणे व मुलांच्या आरोग्यापासून शिक्षणापर्यंतच्या सर्व सेवा खेड्यातच उपलब्ध झाल्यास व रस्ते व इंटरनेट च्या माध्यमातून सर्व खेडी राष्ट्रांशी जोडली गेल्यास सर्वच खेडी स्वयंपूर्ण होण्यास नक्कीच मदत होईल, व गांधीजींच्या स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना प्रत्येक्षात आणता येईल.”
– Nishikant Chavan

 

“गांधीजींनी घोषणा केली होती की खेड्यांकडे चला. आज जर आपल्याला काही करायचा असेल तर सगळ्यात आधी ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधांवरती आपण लक्ष दिलं पाहिजे.चांगले रस्ते, चोवीस तास वीज ,पिण्याचे स्वच्छ पाणी, सांडपाण्याची व्यवस्था या सुविधांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.त्याचबरोबर गावातील प्रत्येक स्त्री स्वयंपूर्ण कशी होईल याकडे पण लक्ष दिले पाहिजे.गावांमधील दोन समाजांमध्ये सलोखा असावा बंधुभाव असावा या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे.गावातील मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं. तरुणांना चांगले संस्कार, चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात जेणेकरून ते स्वतःच्या पायावर उभे राहतील.आणि कितीही आपण मोठे झालो तरी आपण आपल्या गावाशी आपली बांधिलकी आपण जपली पाहिजे.आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या गावातील लोकांना ग्रामस्थांना कसा होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.”
– Siddharth Katariya

 

“Self Sufficient Villages-
The Government of India has many schemes for village development.But thousands of villages today are deprived of basic facilities such as primary health care,education,roads,electricity,water supply etc.as the government machinery is slow and the local representatives lack the assertiveness to get work done on time.For self Sufficient villages Government should use or implement the schemes for
1.Improved Agricultural practices for all farmers
2.Use renewable energy Electricity 3.Sustainable roads 4.portable water supply 5.Education, 6.Sanitation 7.Primary health care etc .
Example :Ralegan Siddhi is in Parner taluka, dist-Ahmednagar,Maharashtra.This village is considered a model of environmental conservation
Conclusion-Mahatma Gandhi’s vision of free India was self-governing, self-reliant, self-employed people living in village communities, deriving their right livelihood from the products of their homesteads.Villagers have built temples, churches and mosques to nurture their faith. Self sufficient villages will build India’s economy much stronger.”
– Manisha Ajetrao

 

“मोहन करमचंद गांधी , या नावपासून सुरू झालेला जीवन प्रवास ,हा मोहन करमचंद गांधी ते महात्मा गांधीजी एवढा मोठा होतो,
.याचे मुख्य कारण म्हणजे म.गांधीजी यांचे सुदृढ समाजासाठी तसेच सामाजिक स्वास्थ्य हे मांनवतेवर आधारित व अहिंसक असावे, व्हावे यासाठी मांडलेले मौलिक विचार ,आणि त्यांचे प्रामाणिक प्रयत्न होय.
म . गांधीजीनी नी ग्रामउद्योग, मूलभूत शिक्षण यांवर अभ्यासक आणि प्रभावी विचार मांडले. कारण हस्तकला ,लघु उद्योग , ग्रामउद्योग यांना चालना मिळून त्यांना एक नवी दिशा मिळेल ,आणि खेड्यातील जनतेस त्यातून मुबलक प्रमाणात आर्थिक साहायय होऊन खेड्यांचे इकॉनॉमिकेली स्वस्थ सुदृढ होईल. आणि खेडी स्वयंपूर्ण होतील .आणि त्यापुढे असा हेतू होता की खेड्यांची स्तिथी सुधारली की ग्रामीण व शहरी यातील दरी कमी होईल व रोजगाराच्या संधी प्राप्त होतील यामुळं अनेक प्रश्न सुटतील.यासाठी गांधीजींनी स्वयंपूर्ण खेडी ही संकलपणा मांडली, परंतु आज या संकल्पने ची स्तिथी गांधीजीन नंतर खूप ढासळत गेली .कारण त्याजवळ झालेला दुर्लक्ष.
आज पुन्हा गांधीजींचा या संकल्पनेकडे समाजाची मूलभूत आवश्यकता व गरज म्हणून पाहण्याची नितांत गरजेचे आहे. कारण भयंकरपणे एक समस्या निर्माण झालेली दिसून येते ती म्हणजे झपाट्याने वाढणारी बेरोजगारीची फळी. आणि याचे प्रमुख कारण म्हणजे लोप पावत चाललेले ग्रामीण स्तरावरील प्राथमिक ग्रामउद्योग लघुउद्योग.आणि मूलभुत शिक्षणाचा अभाव होय. समस्या दूर करण्यासाठी , आज खेड्यातील प्राथमिक स्तरावरील उद्योगांना राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि ते त्यावेळी होईल ज्यावेळी गांधीजींचे विचार त्यांची दूरदृष्टी समजावून घेतली जाईल आणि आत्मसात केली जाईल.
आज भारतात तरुण वयोगटाची संख्या फार मोठी आहे . या गटाकडे एखादी गोषट समजून घेण्याची पडताळण्याची क्षमता फार मोठी आहे . मात्र त्यांना दिशा नाही योग्य मार्गरदर्शन नाही म्हणून गरज आहे ती नवतरुनाना अनुभवी वडीलधाऱ्या माणसांनी पाठबळ देण्याची,मार्गदर्शन करण्याची आणि सहकार्य करण्याची.
तरुण पिढीनेसुद्धा अभ्यासकपने विचार करण्याची आणि विचार मांडण्याची मानसिकता ठेवून मिळणाऱ्या मार्गरदर्शन, आणि सहकार्याचा उपयोग करून घेऊन खेड्यांचा विकासासाठी आणि ते स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नव्हे तर तो त्यांनी ध्यास घेतला पाहिजे. आज तरुण वर्ग फार मोठे शिक्षण घेत आहे .आणि नोकरीचा शोदारधात शहरी भागाकडे वळत आहे जे खूप भयानक आहे .कारण यामुळे खेड्यांकडे दुर्लक्ष होतो आणि शिक्षित वर्ग शहरात जातो व खेडी ओस पडतायत शिक्षित वर्ग अभावी.
आज शिक्षित तरुण वर्गाने खेड्यांची जबाबदारी स्वतःचा कुशलतेवर आणि शिक्षणावर स्वीकारावी. आज आपल्या तरुण वर्गाने ग्रामउद्योग हस्तकला यांचा विकास करून त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा आणि खेड्यातील मुलांना मूलभूत शिक्षण कसे घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करावा.
याचबरोबर प्रत्येकाने स्वयंपूर्ण खेड्यांसाठी पाहिले गांधीजींचे विचार समजून घेणं महत्वाचे आणि ते कृतीत उतरण्याचा प्रयत्न केला पाहीजे.विशेषतः तरुण वर्गाने तरच महात्मागांधीजी यांची स्वयंपूर्ण खेडी ही संकल्पना प्रत्येक्षात आणता येईल.”
– Amol Tambe

 

“In the era of globalisation, despite high economic growth, India has experiencing widening gap between haves and have-nots.
To the certain extent , Gandhi’s idea of ‘self sufficient village’ will play an important role to achieve inclusive growth. This concept emphasises that village should have capacity to meet its basic requirements of the population. This can be done through revival of village level cottage industry such as dairying, cattle farming etc. This will lead to employment generation for local people which will help in poverty eradication. The self sufficient village will also achieve the goal of sustainable Development by optimising local resources. Former President A. P. J. Abdul Kalam has provided the PURA model to achieve this goal. By making our villages self sufficient, India can fulfill the Sustainable Development Goals till 2030.
To the end, I would like to quote, ” Development should be such that it’s body should in cities and soul should be in villages”.”
– Jitesh Nikam

 

“स्वयंपूर्ण खेडी हे महात्मा गांधीचे स्वप्न होते.खेड्याच्यां विकासामध्ये महात्मा गांधीना उद्याचा भारत दिसत होता याकरिता त्यांनी रचनात्मक कार्यक्रमाद्वारे अनेक प्रयोग केलेत. महात्मा गांधीच्या स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणता येण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रयत्न केल्या जावू शकते-
1) सर्वात प्रथम गावाच्या विकासाकरिता गावातील प्रत्येक नागरिक सुजान आणि शिक्षित असने आवश्यक आहे. गावातील बालवयोगटातील प्रत्येक मुलाना प्राथमिक सक्तीचे शिक्षण मिळने आवश्यक आहे त्याकरिता प्रत्येक गावामध्ये शाळा असायला हवी आणि तिथे मुलाना मुलभुत शिक्षणाचे धड़े द्यायला हवे.
2) गावातील तरुणाना स्वयंरोजगार चे प्रशिक्षण देण्याकरिता अनेकानेक उपक्रम राबवीन्यात यावे.
3)स्थानिक प्रशासन व्यवस्थे मध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढविण्याकरिता भर देण्यात यावा.
4) गटचर्चा, समुहचर्चेचे आयोजन ग्रामपंचायत कडून व्हावे.
5) लोकांच्या आरोग्यावर विशेष भर देण्यात यावा.
6) सरकारी योजनेची माहिती अधिकाधिक लोकाना देण्याचा प्रयत्न करण्यात यावा.
7) गावामध्ये कुठल्याही प्रकारचा तंटा होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, जातीय तेढ निर्माण करणार्यांना शिक्षा देण्यात यावी. सार्वजनिक एकोपा निर्माण होईल असे कार्यक्रम घेण्यात यावे.
8) स्वयंसेवक निर्माण होईल असे उपक्रम घेण्यात यावे.
इत्यादि बाबीवर दक्षपूर्वक शाळा, स्थानिक प्रशासनाकडून अमलबजावनी झाली तर खेडी स्वयपूर्ण होण्यास मदद मिळेल.”
– Ashvini Raut

 

“1)आधी स्वतःला इतरांना सांगण्या लायक निस्वार्थी बनवेन.
2)कोणत्याही एका गावाला आपल्या गरजा कमीत कमी ठेवल्यामुळे – आनंदी जीवन कसे जगता येईल हे सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करेन.
3)या साठी गावातील शालेय मुले व महिलांचा आधी पूर्ण उपयोग करता येईल.
4)त्यानंतर गावातील वृद्ध, विविध मंडळांचे तरुण यांचे सहाय्य घ्यावे लागेल.
5)गावात अधिक उत्पादन वाढवून वा अधिक रोजगार निर्माण करून कधीही ग्रामस्वराज्य अस्तित्वात येणार नाही तर गरजा मर्यादित ठेऊन नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर यातून खरे ग्रामस्वराज्य निर्माण होऊ शकेल. आणि गाव त्यातूनच स्वावलंबी होईल.”
– Bhujang Bobade

Reasons behind Gandhiji’s popularity./गांधीजींच्या लोकप्रियतेची कारणे

“भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या लोकांमुळे ओळख होते त्यापैकी एक गांधीजी आहेत . जगात जे महान लोक होऊन गेले आणि आजही जे उच्चपदस्थ अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा गांधीजींचा प्रभाव असल्याचे दिसून येतो. अनेक वर्णभेदविरोधी लोकशाहीवादी चळवळींच्या मागे गांधीजींची प्रेरणा घेऊन चळवळी निर्माण करणारे कार्यकर्ते या जगाने पाहिले आहेत . यावरुनच आपल्याला गांधीजीच्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेचे दर्शन घडून येते. मग तो विज्ञान क्षेत्रात कार्य करणारा आइस्टाइन असो की वर्णभेदाविरुद्ध लढा देणारा एक योद्धा मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला असो की लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या आंग सान सू की आणि मूलतत्त्ववाद्यांना भीड न घालता बालकांच्या शिक्षणासाठी लढणारी नोबेल विजेती मलाला युसूफझाई असो अशा उदाहरणांची यादी तर खूप आहे.
अशी काय जादु या माणसात की आइस्टाइन सारखा शास्त्रज्ञ म्हणतो की पुढच्या पिढ्यांना विश्वास होणार नाही की या जमिनीवर हाडामासाचा असाही कोणी माणूस होता..
गांधीजीच्या या अफाट लोकप्रियतेचं कारण दडले आहे त्यांच्या वैचारिक आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामध्ये कारण त्यामुळेच त्यांना कोणत्याही जाती धर्मात अडवून ठेवू शकत नाही.
साध्या रहाणीमुळे आणि उच्च विचारसरणी मुळे त्यांनी भारतीय जनमानसात आपले स्थान निर्माण केले. व्यक्तिगत हिंदू धर्मांचे पालन करत असताना त्यांनी कधी कुण्या धर्माविषयी द्वेष भावना किंवा अनुद्गार काढले नाहीत उलट त्यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण समाजाला दिली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यावर सुद्धा त्यांचा प्रभाव होता 1922 ला जेव्हा त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला घेऊन गेला त्या वेळेस जेव्हा त्यांना न्यायालयात आणले गेले तेव्हा न्यायाधीश broomfield हे गांधीजीच्या सन्मानाने उभे राहिले होते.”
– Abhijit Sable

 

तत्कालिन हिंसात्मक वातावरनामध्ये कुणीतरी अवलिया अहिंसा पालन करण्याचे सांगतोय हे विलक्षण होते…शांततेने प्रश्न सुटतात हे ते लोकांना पटवून देत होते..लोकांना आपलंसं करण्याची अद्भुत शक्ती त्यांना साध्य होती…स्वच्छतेचे पुजारी म्हणुन एक नवीन प्रतिमा जोडीला होती…खेड्याकडे चला असं सांगून लढ्यात स्थानिक पातळीवरच्या लोकांना सहभागी करून घेण्याची इच्छा खूप नाविन्यपूर्ण होती…स्वदेशी मुळे माणस जोडली गेली…विचारांनी देश बदलवून टाकण्याचे सामर्थ्य निर्माण झाले…म्हणून गांधींजी लोकप्रिय आहेत…
– Abhijit Pawar

 

“गांधीजींच्या आगमनापूर्वी स्वातंत्र्यचळवळ ही एका विशिष्ठ बुद्धिजीवी वर्गापूर्ती मर्यादित होती . या वर्गाने देशातील बहुसंख्य असणाऱ्या कामगार आणि शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष केले होते.गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह 1917 अहमदाबाद गिरणी कामगार लढा खेडा सत्याग्रह यांद्वारे शेतकरी आणि कामगार वर्गाचे प्रश्न सोडविले देशातील गरीब अन्यायग्रस्त जनतेकडे लक्ष दिले. गरिबातल्या गरीब लोकांच्या हितासाठी निःस्वार्थपणे गांधीजींनी प्रयत्न केले हे गांधीजींच्या लोकप्रियतेचे मला प्रमुख कारण वाटते
2 गांधीजी जसे बोलत तसे वागत म्हणजे गांधीजींच्या उक्ती आणि कृतीत फरक नव्हता बोले तैसा चाले अशी गांधीजींची वृत्ती होती
3 गांधीजी मोठे तत्वनिष्ठ होते त्यांनी कधीही त्यांनी मांडलेल्या तत्वांशी तडजोड केली नाही.अहिंसा या तत्वाशी गांधीजींनी कधीही तडजोड केली नाही शेवटपर्यंत गांधीजींनी ब्रिटिशांशी अहिंसक मार्गाने लढा दिला
4 गांधीजी स्वतःला सनातन हिंदू मानत पण त्यांनीही कधीही इतर धर्माचा द्वेष केला नाही
5 गांधीजींनी नेहमी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका घेतली . गांधीजींचे कट्टर विरोधक असलेल्या डॉ आंबेडकरांना संविधान सभेत घेण्याची सूचना महात्मा गांधीजींनी केली होती. महात्मा गांधी म्हणतात “देशातली सात लाख खेडी हा भारताचा आत्मा आहे ही खेडी स्वावलंबी व स्वयंपूर्ण झाल्याशिवाय खर स्वराज्य अवतरणार नाही” गांधी पुढे म्हणतात” देशाच्या भविष्य निर्मितीत माझाही अल्पसा वाटा आहे असं ज्यावेळी गरीबातल्या गरीब व्यक्तीला वाटेल त्यावेळी स्वराज्य आलं अस मी समजेन “
6 भारत हा देश फक्त हिंदूंचा नसून त्यावर मुस्लिम शीख ख्रिश्चन जैन इ धर्मियांचा तेवढाच अधिकार आहे ही सर्वसमावेशक राष्ट्रवादाची भूमिका गांधीजींनी मांडली
7 स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, मानवता लोकशाही रुजविण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न केले
8 जे काम हाती घेतल ते समग्रतेच्या भावनेनं केलं तो माणूस महात्मा गांधी होता
9 गांधीजी स्वावलंबी जीवन जगले. जास्त उपदेश न करता त्यांनी आपल्या आदर्श आचरणातुन लोकांना प्रभावित केले
10 गांधीजींनी कधीही अन्याय सहन न करता सत्याग्रहाच्या मार्गाने अन्यायाविरुद्ध व्यापक लढा उभारला
सरदार वल्लभाई पटेल, जवाहरलाल नेहरू भारताच्या दोन नेत्यांना शेवटपर्यंत एक ठेवण्यात गांधीजी यशस्वी ठरले”
– Mayur Dumane

 

“reasons behind popularity of Gandhiji :-
1) simplicity which connects them with common masses easily.
2) intelligence in designing simple programs such as wearing khadi linked with national movement. gathering huge mass with small act insted of small group with big sacrifices.
3)constructive work :- focus on constructive work for empowerment of citizens. eg. many ashrams estblished with gandhiji’s thought were experimenting in education,social life,health and so on.
4) gandhiji’s attachment with common man unlike others who were attached with ideology. gandhiji takes different path than ideology for common man.
5) care for all :- manifests in every act. ashrams became safe place for families of persons who jailed for political activities for independence.
6) Gandhiji’s thought on religion and “degree” of seperation from public life. unlike marx who sees religion as opium of masses and criticised religion instead of accepting it as inalienable fact for common people. gandhiji recognised this fact and used for moral upliftment of society insted of just criticizing.
these were some factors which makes gandhiji a popular leader.”
– Ashutosh Bafna

 

“गांधीजी सर्वसामान्यांना आपल्यातीलच वाटत. बोले तैसा चाले याप्रमाणे गांधीजींनी जे बोलले ते करून दाखवले . त्यांच्या चळवळीचे मार्ग सुद्धा सामान्यांच्या आवाक्यातील होते . गांधीजींचे देशाविषयी आकलन परिपूर्ण होते ते सामान्यांची भाषा बोलत त्यांच्या मनात असलेल्या भावनांना वाट देत तळागाळातील लोकांना त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सामिल करून घेतलं त्यामुळे प्रत्येकाच्या मनात देशाला योगदान दिल्याची भावना निर्माण झाली त्यामुळेच गांधीजी लोकप्रिय होते”
– Vishal Wagh

 

“सामाजिक काम करताना कधी-कधी कंटाळा यायचा, निरस वाटायचं. त्यामागची कारणे शोधून खूप सापडायची व कामातील उर्जा निघून जायची. पुढे गांधी विचारांच्या कार्यकर्त्या विषयी वाचनात आलं. त्यातील एक वयाच्या ८० व्या वर्षी शेती संशोधन करत होते. एवढा निरस विषय, पण कामातील उत्साह संपण्याऐवजी वाढत आहे असं ते म्हणत होते. चकित झालो. थोडासा अभ्यास केल्यावर लक्षात हा बाबा काहीतरी वेगळं सांगत आहे. आधी स्वतः पासून सुरूवात करायला सांगत आहे. गांधीचं हे नेमक्या वेळी उगवणं, त्यांना लोकप्रिय करतं.”
– Avinash Pawar

 

“His timeless principles like Truth & Non- violence.
The transparency & honesty throughout his life.
The universality in his ways of protest like ‘Satyagrah’, ‘Sawinay Kayadebhang’, ‘Swadeshi’ etc.
His maturity & openness of mind for all the suppressed & neglected social factors as I called untouchables, women etc. to include reputedly in the main social stream by strengthening social justice & it’s reach to one & all inclusiveness.
Gandhi’s strong stand in South Africa about the injustice.
His simplicity & visionary efforts.
Gandhiji’s revolutionary reforms & secular religious approach.
Gandhiji’s peaceful firmness & continued worth actions.
His unique, innovative & positive thinking & studious approach.
Gandhi’s number of written contributions to the society including ‘My experiments with truth’, ‘Nai Talim’ etc.”
– Supriya Rakh

 

“काहीही झाले तरी आपल्या निर्णयापासून परावृत्त ना होणे.गांधीजींची सत्य,अहिंसा हि मुल्ये खरे तर महात्मा गांधीयांचे विचार आजही कालसुसंगत आहेत.आज चंगळवादी जीवन शैली बोकाळते आहे.अशा वेळी गांधी यांचे विचार किती महान होते याची खात्री पटते.महात्मा गांधी यांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही.पराकोटीचे निग्रही होते.त्यांच्या सचोटी बद्दल लोकांच्या मनात शंका नव्हती.”
– Surendrakumar Ghadge

 

आज महात्मा गांधी अचानक प्रकट झाले तर…/ If Gandhiji suddenly appeared today….

“आज गांधीजी अचानक प्रकट झाले तर…
याच कल्पनेत भारताच्या महासत्ताक बनण्याचे सार दडलेले आहे. सध्याची भारताची परिस्थिती पाहता भारत अनेक अंतर्गत प्रश्नांनी वेढलेला आहे. धार्मिक व जातीय स्तोम पुन्हा माजले आहेत. बापू अचानक प्रकट झाले तर त्यांना हे पाहून दुःख होईल पण ते पुन्हा जोमाने लढतील व नवी चळवळ यासाठी उभी करतील. गांधीवाद नक्की काय असतो हे बापूंच्या आयुष्याविषयी अभ्यास न करता व्यक्त होणाऱ्या तरुणांना तेव्हा प्रत्यक्षात समजेल .”
– Jayant Sonawane

 

“आज जर बापु पुन्हा प्रकट झाले तर त्यांना स्वताची ओळख पटवुन द्यावी लागेल. त्यांच्या विचारांना समजन्यासाठी जो वेळ लागेल व ज्यांच्यासाठी हे विचार खुप मह्त्वपूर्ण आहेत ते तरुण तो वेळ देउ शकतील का?कारण भारत हा तरुणांनाचा देश आहे आणी या तरुणांना रोजगाराची नितांत गरज आहे आनी हि समस्या कशा प्रकारे सोडवली जाईल याचा त्यांना मोठा प्रश्न पडेल. कारण जर तरुणांनाच्या हाताला रोजगार मिळाला तर सर्व नाहि पन काही प्रमाणात सामाजीक समस्या कमी होतील हा विचार ते नक्कीच करतील.”
– Chetan Kamble

 

“If Gandhiji suddenly appeared today he will be sad over the circumstances prevailing in the society. Though India has achieved great levels of growth and development ; it is not able to ensure an egalitarian society. As per Gandhiji’s opinion , development is wiping out tears from the last man’s eyes. If he appears today he will feel that even after 70 years of independence the concept of Surajya has not been implemented truly. He will be disappointed over the riots going on in the country over caste and religion based differences. No doubt, seeing these events he will again engage himself in uniting the country as a father of the nation. He will express and strive to achieve equity and justice. His message will be to adopt the tools of truth and non violence.
Hence today we need to work by standing to this principle. Rather than thinking about what if Gandhiji appeared today?; we have to think of him as alive among us with his enduring principles. If everyone tries to adopt his teachings in everyday life,he will remain alive in our minds and souls guiding us for the making of a better India for tomorrow.”
– Rajashree Bhirud

 

“आज गांधीजी अचानक प्रकट झाले तर त्यांना 1947 साली स्वतंत्र झालेला भारत आणि आत्ताचा भारत यात खूप फरक दिसेल. किंबहुना आजचे राजकारणी, त्यांच्याद्वारे केले जाणारे गलिच्छ,धर्मधारित राजकारण याविषयी गांधींना खूप राग येईल आणि त्यांना हे लक्षात येईल की पूर्वीसारखे लोककल्याणाचा ध्यास घेतलेले नेते आज बघायला मिळेनात.
गांधीजींनी दिलेल्या सत्य व अहिंसेच्या मूल्यांच्या जागी आता प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते त्याच मूल्यांचे उल्लंघन करताना दिसतील.
गांधींना हेही समजेल की मी आत्ताच्या भारतात फक्त नोटेवर आणि सरकारी कार्यालयात फोटो पर्यंत सीमित राहिलो आहे.
आणि त्यांना लक्षात येईल की स्वातंत्र्यानंतर भारताचे राजकारण उत्तरोत्तर बिघडत गेले आहे की त्यातून विकसित भारत निर्माण होण्याची अपेक्षा आहे.”
– Shubham Dhane

 

“गांधी आज प्रकटले तर…. आजच्या भारताचा ते सम्पूर्ण आढावा घेतील। त्यांच्या शिष्य नेहरू च्या देशाच्या पायाभरणी व उभारणी कामाने समाधानी होतील। पटेलांच्या भारत एकसंध त्येवण्याचे कौतुक असेल च पण त्याच वेळी त्यातील विभागलेला, असंवेदनशील समाज पाहून दुःखी होतील। सत्याग्रहाची बोथट झालेलं अस्त्र नव्याने पारखतील। आजच्या भारतीय मनाचा शोध घेतील। सर्वांना जोडणाऱ्या आणि आजच्या समाजला एकसंध ठेवणाऱ्या सामायिक कार्यक्रमाची आखणी करतील । यात अस्वस्थ दलित व मुस्लिम ख्रिस्त समाज प्रामुख्याने लक्ष केलेला असेल। आज च्या काँग्रेस ला पूर्ण झिडकारून देण्यात त्यांना वाईट वाटणार नाहीं। पण एकत्र ठेवण्यासाठी योग्य कारणांचा शोध घेतील। पाकिस्तान च्या भेटी ला तेथील सामान्य जनतेला साद घालतील । भारताच्या इतर कोणत्याही भागापेक्षा आज ते काश्मीर वर लक्ष केंद्रित करतील । तेथील जनतेच्या समाधानासाठी जनमत घेण्याची मागणी तर निश्चित करतील।”
– Amol Wakle

 

“आज महात्मा गांधी अचानक प्रकट झाले तर आनंदित होण्यापेक्षा काहीसे निराश होतील कारण ते पाहतील की मी जेव्हा येथून निघुन गेलो त्यापेक्षा कितीतरी आधिक भैतिक प्रगति या देशाने केली आहे परंतु वैचारिक प्रगति मात्र म्हणावी तितकी झाली नाही .अहिंसा सत्य या गोष्टी म्हणाव्या तितक्या रुजल्या नाहीत .खेड़ी स्वयंपूर्ण झाली नाहीत.समता शेवट पर्यंत पोहचली नाही.
परंतु ते हार माननार नाहीत आणि म्हणतील चला अता आपण नव्याने नवा भारत घडवुया ज्यामधे समता बंधुता न्याय स्वतंत्र शेवट पर्यन्त पोहचेल.आणि पुन्हा एकदा म्हणतील DO OR DIE अर्थातच करा किंवा मरा.”
– Sudhir Mane

 

“आज जर गांधीजी अचानक प्रकट झाले तर त्याना विश्वास बसणार नाही की ते नक्कीच भारतात आलेत का?? सगळीकडे फ़क्त अणि फ़क्त जातीचे राजकारण झाले आहे कुनाला देशाचे काही पडलच नाही सगळ्यांना आपली आपली वोट बैंक सक्षम करण्यासाठी जातीचा आधार घ्यावा लागतो आहे , अणि मग त्यातून सुरु झालेल्या जातीय दंगली , ज्या गांधीजीनि आपली संपूर्ण हयात अहिंसा वादी जगन्यासाठी घालवाली त्यांच्या च देशात सुरु अस्लेल्ला हा गोंधळ ते नाही बघू शकणार , गांधीजी नेहमी म्हणत की खेडयकडे चला, पण आज गांधीजीनि त्याच खेड्यात जाउ न पाहिल तर त जी निरागसता त्यावेळी होती तीआता नष्ट झालेली दिसेल त्याना भौतिक विकास तर दिसेल पण सामाजिक परिस्थिति कोलमडून गेलेली दिसेल तेव्हा ते स्वतःच म्हणतिल हे राम …..”
– Akash Hanjage

“आज गांधीजी अचानक प्रकट झाले तर आजची देशाची परिस्थिती जाति-धर्मामधिल वाढलेला तेढ,समाज,स्त्रीयांविषयी वाढलेला अनादर, वाढलेली अराजकता यांच्या मूळाशी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतिल.देशात सलोखा वाढण्यासाठी काहि नविन सत्याग्रह करता करतिल.गांधीजी अचानक प्रकट झाले तर संविधानाचे पालन व भारत देश हाच धर्म हि संकल्पना रुजविण्याचा नक्कीच प्रयत्न करतिल कारण यासाठी आज आपणांस गांधीजी आणि गांधी विचारांची देशाला खुप गरज आहे.”
– Shashikant Kawale

 

 

उत्तरतालिका/Answerkey

1. गांधीजींसाठी 1917 मध्ये गुजरातच्या ग्रामीण भागातून चरखा कोणी शोधून काढला?/Who discovered Charkha from rural areas of Gujrat for Gandhiji?

कमलादेवी चट्टोपाध्याय/Kamladevi Chattopadhyay

कस्तुरबा गांधी/Kasturba Gandhi

गंगा बहेन/Ganga Bahen✔✔

सरोजिनी नायडू/Sarojini Naidu

माहीत नाही/Don’t know

2. 1930 मध्ये येरवडा कारागृहात गांधीजींची सेवा करण्यासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती?/Who was appointed in the services of Gandhiji in Yerawada jail in 1930?

महादेव देसाई/Mahadev Desai

काका कालेलकर/Kaka Kalelkar✔✔

प्यारेलाल/Pyarelal

मनू गांधी/Manu Gandhi

माहीत नाही/Don’t know

3. पुढीलपैकी कोणत्या नियतकालिकाशी गांधीजी संबंधित नव्हते?/With which journal was Gandhiji not related?

सर्वोदय पत्रिका/Sarvodaya Patrika✔✔

इंडियन ओपिनियन/Indian Opinion

नवजीवन/Navjeevan

हरिजन बंधू/Harijan Bandhu

माहीत नाही/Don’t know

4. पुढीलपैकी कोणावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव पडलेला आढळत नाही?/Which of the following personalities does not seem to have influenced by Mahatma Gandhi’s thoughts?

बाराक ओबामा/Barak Obama

ओंग सान स्यू की/Aung San Suu Kyi

मलाला युसुफझई/Malala Yousafzai

वरील सर्वांवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव आहे/All these personalities are influenced by Gandhiji’s thoughts✔✔

माहीत नाही/Don’t know

5. गांधीजींनी सत्याग्रह आश्रमाची स्थापना कोठे केली?/Where did Gandhiji started Satyagraha Ashram?

अहमदाबाद/Ahmedabad✔✔

वर्धा/Wardha

जोहान्सबर्ग/Johansberg

डरबन/Durban

माहीत नाही/Don’t know

6. साध्य व साधन यांच्याविषयी गांधीजींचे विचार काय होते?/What were Gandhiji’s thoughts about goals and tools?

साध्य व साधन दोन्हीही चांगले असले पाहिजेत/Both goals and tools should be good✔✔

साध्य चांगले असले तर साधने चांगली नसली तरी चालतील/If goals are good, there is no problem if tools are not good

साध्य व साधने यांचा काहीही संबंध नाही/There is no relation between goals and tools

फक्त साधने चांगली पाहिजेत, साध्य कसेही असले तरी चालेल/Tools should be good, there is no matter what the goals are

माहीत नाही/Don’t know

7. ब्रह्मचार्याविषयी गांधीजींच्या मतानुसार पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?/Which of the following statement is wrong according to Gandhiji’s thoughts on Brahmacharya?

जी व्यक्ती सत्य सोडून इतर गोष्टींची आराधना करते तिला व्यभिचारी म्हणावे लागेल/ Person, who persuades things other than truth is to be said as adulterous

अहिंसेचे पूर्णपणे पालन ब्राह्मचार्याशिवाय अशक्य आहे/True persuation of nonviolence is impossible without celibacy

ब्रह्मचर्य ही केवळ एक शरीराशी संबंधित संकल्पना आहे, त्याच्याशी मनाचा काहीही संबंध नाही/Celibacy is a concept only related to body, there is not any relation of it with mind✔✔

जिभेवर ताबा ठेवल्याने ब्रह्मचर्य पालन खूप सोपे होते/Control over our tongue makes persuation of celibacy easier

माहीत नाही/Don’t know

8. मी दूध न पिण्याचे व्रत घेतले आहे. पुढे मला एक आजार झाला, ज्याच्यावर डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे दुधाचे सेवन हा एकमेव उपाय आहे. दूध कोणत्याही रुपात का होईना, शरीरात जाणे आवश्यक आहे;अन्यथा जीवाला धोका होऊ शकतो. अशा वेळी मी काय करावे?/I have taken vow not to consume the milk. Later on I faced a disease. According to doctor, consumption of milk is aonly remedy on it. It is necessary to consume milk, by whatever mean it may be; otherwise it may cause threat to my life. What should I do?

काहीही होवो, दुधाचे सेवन करू नका./Do not consume milk, whatever it may cause.✔✔

तुम्ही दुधाची शपथ घेतली आहे, चहाची नाही. तेव्हा दूध घातलेला चहा प्या./You have taken a vow of milk, not tea. Take the tea prepared using milk.

हा जीवनमरणाचा प्रश्न आहे, तेव्हा औषध म्हणून दूध घेणे ठीक आहे/It is question of your life. It will be proper if you take milk as medicine.

आणीबाणीच्या वेळी व्रताचा भंग करणे चुकीचे नाही/It’s not wrong to break the vow in the event of emergency.

माहीत नाही/Don’t know

9. पुढीलपैकी कशाचा गांधीजींनी सांगितलेल्या सात पापांमध्ये समावेश नाही?/Which of the following is not included in the seven sins told by Gandhiji?

त्यागाशिवाय धर्म/Religion without sacrifice

निस्वार्थ भावाशिवाय मैत्री/Friendship without selflessness✔✔

चरित्र्याशिवाय ज्ञान/Knowledge without character

अत्म्याशिवाय सुख/Pleasure without conscience

माहीत नाही/Don’t know

10. अस्तेय व्रतामध्ये कशाचा समावेश होत नाही?/What is not included in Asteya?

आपल्याला गरज नसलेली एखादी वस्तू तिच्या मालकाची परवानगी घेऊन घेणे/Take anything which is not required by you with the permission of owner of that thing.

आपल्याला गरजेची वस्तू तिच्या मालकाची परवानगी न घेता घेणे/Take anything which is required by you without permission of the owner of that thing.

आपल्याला गरजेची वस्तू तिच्या मालकाची परवानगी घेऊन घेणे/Take anything required by you with the permission of the owner of that thing.✔✔

एखाद्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या गोष्टीचा आपण शोध लावला असा दावा करणे/Claiming the invention of the thing which was in existance.

माहीत नाही/Don’t know

11. दक्षिण आफ्रिकेत गांधीजी कोणता व्यवसाय करीत होते?/What was the profession of Gandhiji in South Africa?

भाषांतरकार/Translator

हिशेबनिस/Accountant

वार्ताहर/Reporter

वकील/Lawyer✔✔

माहीत नाही/Don’t know

12. गांधीजींवर 25 जून 1934 रोजी हिंदुत्ववाद्यांकडून पुणे शहरात बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यामागील मुख्य कारण काय होते?/In Pune city, the attempt of bomb attack on Gandhiji was done on 25 June 1934 by Hindu extremists. What was main reason behind this?

गांधीजींचा पाकिस्तानच्या मागणीला असलेला पाठिंबा/Gandhiji’s support to demand of formation of Pakistan

अस्पृश्यता निवारणाच्या कार्यद्वारे गांधीजींनी उच्च जातींच्या वर्चस्वाला दिलेला धक्का/Shock givenby Gandhiji to dominance of upper castes through tasks of untouchability prevention✔✔

गांधीजी मुसलमानांचे करत असलेले लाड/Gandhiji’s indulging of Muslims.

पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा गांधीजींचा हट्ट/Gandhiji’s insistence to give ₹55 crores to Pakistan

माहीत नाही/Don’t know

13. दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्धाच्या वेळी गांधीजींनी काय भूमिका घेतली?/What was Gandhiji’s stand at the time of Boer war in South Africa?

त्यांनी इंग्रजांना शक्य ती सर्व मदत केली/He helped British as much he could✔✔

त्यांनी बोअर लोकांना शक्य ती सर्व मदत केली/He helped Boers as much he could

ते तटस्थ राहिले/He remained neutral

ते तेवढ्या काळापुरते भारतात निघून आले/He came to India for that period

माहीत नाही/Don’t know

14. भगतसिंग यांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी कोणाशी चर्चा व पत्रव्यवहार केला?/With whom Gandhiji discussed and wrote letters to prevent hanging of Bhagatsingh?

रॅमसे मॅकडोनाल्ड/Ramse McDonald

पंजाबचा गव्हर्नर/Governer of Punjab

लॉर्ड आयर्विन/Lord Irwin✔✔

गांधीजींनी असे कोणतेही प्रयत्न केले नाहीत/Gandhiji did not do such efforts.

माहीत नाही/Don’t know

15. गांधीजींनी 1940 मध्ये पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कुणाची निवड केली?/Who was selected as first personal Satyagrahi by Gandhiji?

पंडित नेहरू/Pandit Nehru

वल्लभभाई पटेल/Vallabhbhai Patel

सेनापती बापट/Senapati Bapat

विनोबा भावे/Vinoba Bhave✔✔

माहीत नाही/Don’t know

16. महात्मा गांधींच्या मते गांधीवाद म्हणजे काय?/What is Gandhism according to Mahatma Gandhi?

गांधीवाद नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही/There is nothing in existance such as Gandhism✔✔

सत्य व अहिंसेचे पालन म्हणजे गांधीवाद/Gandhism means persuation of truth and nonviolence

अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणे म्हणजे गांधीवाद/Gandhism means resistance against injustice

पर्याय क्रमांक 2 व 3 दोन्ही/Both options 2 and 3

माहीत नाही/Don’t know

17. तुम्ही तुमच्या धर्मातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहात. दुसऱ्या एका धर्मातील एक पुढारी तुमच्या धर्माविषयी विषारी वक्तव्ये देत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल?/You are a prestigious person in your religion. A leader from another religion delivering poisonous statements regarding your religion. What will you do?

मीही त्या धर्माविषयी त्याच भाषेत वक्तव्ये देईन/I will also deliver statements regarding that religion in same language.

माझ्या धर्मातील लोकांना संयम व शांतता राखण्याचे आवाहन करील व शक्य असल्यास त्या नेत्यास अशी वक्तव्ये न देण्याचे आवाहन करीन/Will appeal people of my religion to keep peace and patience and will appeal to that leader not to do such statements, if possible.✔✔

त्या नेत्यांची पोलिसात तक्रार करीन/Will complain about that leader in police.

काहीही करणार नाही व जे घडते ते पाहत राहीन/Will not do anything. Only will see what is happening.

माहीत नाही/Don’t know

18. तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आहात. तुमच्या संस्थेसाठी देणगी मिळवण्यासाठी लॉटरी योजना सुरू करून लॉटरीची तिकिटे सामान्य जनतेत विकावीत अशी कल्पना तुमच्या एका हितचिंतकाने मांडली आहे. तुम्ही ती स्वीकाराल काय?/You are a social worker. One of your well-wishers suggested you an idea that you should start lottery scheme and sell lottery tickets in general public to mobilize funds for your organization. Will you accept the idea?

हो. त्यातून समाजकल्याणाची कामे करता येईल/Yes. Social welfare works can be done using that fund.

नाही. चांगल्या साध्यासाठी साधनेही चांगली हवीत व लॉटरी हे काही चांगले साधन नाही/No. There should be good tools to achieve good aims and lottery is not a good tool.✔✔

हो. चांगल्या कामासाठी पैसे देण्यास लोकांना प्रवृत्त करण्याची ही नाविन्यपूर्ण कल्पना आहे/Yes. It’s innovative idea to motivate people to give money for good work.

नाही. देणगी मिळवण्याच्या इतर मार्गांपेक्षा हा मार्ग जास्त खर्चीक आहे./No. It’s more expensive way to mobilize the donations

माहीत नाही/Don’t know

19. तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक आहात. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळेत जेवण तयार करण्यासाठी तुम्ही ज्या माणसाची नियुक्ती केली आहे, तो दलित समाजातील आहे. गावातील सवर्ण लोक त्या माणसाला काढून टाकून त्याच्याजागी उच्च जातीतील व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी दबाव आणत आहेत. तुम्ही काय कराल?/You are a headmaster of a school. A person apoiinted by you to cook the food under Shaley Poshan Ahar Yojana in the school is among depressed classes. Upper caste people of village are pressurizing you to fire that man from job and to appoint upper caster person on that place. What will you do?

दबाव आणणाऱ्या लोकांची पोलिसात तक्रार करीन/Will complain in police about people who are pressurizing.

सर्व परिस्थिती वरिष्ठांना कालवून त्यांच्या सल्ल्याची वाट पाहीन/Will wait for an advise after reporting the situation to seniors

गावातील लोकांना सामाजिक समानतेचे महत्व पटवून देऊन भेदभाव न करण्याविषयी त्यांचे मन वळविन. तसेच मुलांच्या मनात हे जातीभेदाचे विष खालावल्याने होणारे तोटे समजावून सांगेन/Will expound villagers the importance of social harmony and equality. Will persuade them not to discriminate among castes. Also tell them threats arising from creating minds of childrens poisonous in such a way.✔✔

त्या गावातून बदली व्हावी म्हणून अर्ज करीन/Will apply for transfer from that village.

माहीत नाही/Don’t know

20. ‘नई तालीम कशाशी संबंधित आहे?/’Nai Talim is related to?

मूलभूत शिक्षण/Basic education✔✔

अस्पृश्यता निवारण/untouchability prevention

धार्मिक सलोखा/Religious harmony

ग्रामोद्योग/Vilkage industries

Leave a Reply