Rules

Knowing Gandhism Global Friends समूहाचे नियम

सर्व ग्रुप सदस्यांचे स्वागत .🔴 🍃💐🍃🙏

एक गोष्ट लक्षात घ्या हा समुह forwarded messages किंवा timepass चर्चेसाठी नाही त्या हेतूने कोणी जॉईन झाले असेल तर आत्ताच समुह सोडावा

समूहाद्वारे विचारमंथन आणि कृती दोन्ही कार्यक्रम घेतले जातात त्यात सहभागी व्हावे

✒📃📋🍀*Knowing Gandhism* 🍀

🔴समुहाचे नियम व माहिती

*”Knowing Gandhism Global Friends* ” या आपल्या समूहाचा मुळ हेतु आपल्या सर्वांपर्यंत गांधीविचार केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळे चांगले विचार, चांगले कार्य , वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरील वेगवेगळी मते , पोहचवणे , सामाजिक कार्यांत सहभागी होणे , दिशाभुल करणार्या साहित्यांविरुध्द कार्य करणे व त्यातुन विचारांची प्रगल्भता वाढवून मानवतेचा विचार वृद्धिंगत करणे हा आहे . त्यामुळे जरी आपणास योग्य पोस्ट करता आली नाही तरी चालेल पण त्या पोस्ट तुम्हाला वाचण्यास मिळणे हे महत्वाचे आहे.*

सर्वांनी पोस्ट करताना ग्रुपच्या विषयाशी ( केंद्रस्थानी गांधीविचार,सामाजिक प्रश्न, सामाजिक कार्य) संबंधित असेल याची काळजी घ्यावी .

*ग्रुपमध्ये भिन्न मतांचे सदस्य असुन ही मते प्रदर्शन करताना व्यक्तिगत पातळीवर जाऊन वाद अथवा भांडण होऊन कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे*

*एखाद दोन सदस्याचे मत म्हणजे पूर्ण समूहाचे मत ठरवून समूहच असा आहे असे ठरवू नये

समूहाच्या कृती कार्यक्रर्मात सहभाग घ्यावा आणि मग आपले मत बनवावे*

*ग्रुपमध्ये जरी पोस्ट करणे शक्य नसले तरी किमान एकदा चित्रलिपी ( 👌👍✅❓❌🚫👎👏🙏….ईत्यादी ) किंवा अक्षर लिपीत आपले मत मांडुन आपली सक्रियता दाखवावी.*

*ग्रुपमध्ये आपल्या मताशी कोणी सहमत होत नाही अशा अवस्थेत ग्रुपच्या नावाबद्दल , उद्देशाबद्दल कोणत्याही स्वरूपाच्या सुचना कोणीही देऊ नये , ईतर विचार व दृष्टिकोन समजुन घेण्याचा प्रयत्न करावा. ग्रुपबाबत महत्वाच्या काही सुचना , बदल सांगायचेच झाले तर ग्रुप अॅडममिनला तसा व्यक्तिगत मॅसेज पाठवावा.*

*कृपया विनंती आहे की खालील नमुद केलेल्या प्रकारातील पोस्ट करू नये ; तसे झाल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता तात्पुरते ग्रुप सदस्यत्व रद्द केले जाईल.*

1.कोणताही अश्लील विनोद, शिवी वा इतर काही

2.दैवी किंवा ईतर कोणतेही चमत्कार करणारे मॅसेज फोटो ,
अमुक ही पोस्ट … एवढ्या लोकांना … ग्रुपमध्ये पाठवा .

3-जाहिरात

4. ग्रुपमध्ये एकदा पोस्ट झालेला मॅसेज पुन्हा पोस्ट करणे .

6. एखादी चुकीची viral post

7. अश्लील पोस्ट , शिवीगाळ इत्यादी सारखे बदनाम कृत्ये जे आपली समाजातील ओळख वाईट करतात व काही अंशी ते आपले खरे सुक्ष्म स्वरूप देखील दर्शवितात .

8. राजकीय प्रचाराच्या पोस्ट टाळायला हव्या पण राजकीय घटनांबद्दल विश्लेषण करून समजुन घेणे आपल्या पिढीसाठी महत्वाचे आहे .
आपल्या जगण्याच्या प्रत्येक गोष्टीवर राजकीय निर्णयाचा परिणाम होत असतो म्हणून राजकीय घटनांबद्दल तटस्थपणे कोणत्याही नेत्याच्या , पक्षाच्या भक्त किंवा विरोधकाच्या भुमिका , निवडणुकपुर्व प्रचारी पोस्ट टाळुन चर्चा होणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे .

9. समाजातील विषमता नष्ट करून समानतेकडे , मानवतेकडे प्रवास करणे हाच आपला मार्गक्रम आहे . म्हणूनच जातीय आकडेवारी व तपशील देत “ईतिहासाचे कैदी” होऊन नवीन जातीयवादी मांडणी करत जातींना भक्कम करत जातीय अस्मिता (स्वाभिमान , अभिमान , गर्व ) असणाऱ्या पोस्ट कोणीही करू नये .

10.ही लिंक open करा वगैरे सारखे मेसेज

*नियम न पाळल्यास*

*पहिल्या वेळी एक दिवसासाठी सदस्यत्व रद्द*

*दुसऱ्या वेळी दीर्घ कालावधीसाठी सदस्यत्व रद्द*

*तिसऱ्या वेळी कायमचे सदस्यत्व रद्द केले जाईल*

Leave a Reply